देऊरवाडा(काजळी)येथील श्री लक्ष्मी बालाजी संस्थान ची तीर्थस्थापना,आठ दिवस राहणार बालाजी उत्सव बादल डकरे:- चांदुर बाजार

0
1379
Google search engine
Google search engine

देऊरवाडा(काजळी)येथील श्री लक्ष्मी बालाजी संस्थान ची तीर्थस्थापना,आठ दिवस राहणार बालाजी उत्सव

बादल डकरे:- चांदुर बाजार

विदर्भातील छोटी काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदुर बाजार तालुक्यातील अनेक साधु संत आणि देवतांचा वास असलेले देऊरवाडा(काजळी)येथील बालाजी यात्रा महोत्सव ला सुरुवात झाली असून विजय दशमी ला या ठिकाणी तीर्थस्थापना करण्यात आली आहे.

यामध्ये बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर पासून ते दिनांक 15 ऑक्टोबर पर्यत हा बालाजी उत्सव राहणार आहे.यामध्ये देऊरवाडा(काजळी)येथील ब्राम्हणपुरी बालाजी संस्थान आणि भोगाडेपुरी बालाजी संस्थान चे गावात ताटिवहन आणि शोभा यात्रा ही संपूर्ण गावातून काढली जाते.यावेळी अनेक भाविक भक्त याची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते तर दूर दूर वरून या ठिकाणी भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात.तसेच या ठिकाणी पोलिसा बरोबर मुस्लिम समाजातील अनेक लोकांचे मोठे सहकार्य लाभले असते.त्यामुळे या यात्रेला हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून सुद्धा संबोधले जाते.रात्र भर गावातून ताटी आणि रथ याचे शोभा यात्रा काढली नंतर दुसऱ्या दिवशी त्याचे पूर्णा नदी पात्रांत येतात.यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थिती बालाजी ची आरती केली जाते.

काजळी देऊरवाडा माधान शिरजगाव कसबा अचलपुर ब्राम्हणवाडा थडी,घातलाडकी चांदुर बाजार,या भागातील मोठ्या प्रमाणात या महोत्सव दरम्यान भाविकांची गर्दी पाहायला मिळते.तर आपले मागितलेली नवस पूर्ण झाल्यावर बालाजी रथ समोर भाविकांची लोटांगण पडून आपले नवस फेडले जाते अशी पुरातन आख्यायिका असल्याचे बोलले जाते.तर या यात्रेत लोटांगण सुरू असताना अनवाणी पायाने जावे लागते अशी आख्यायिका आहे.या यात्रा महोत्सव मध्ये मोठ्या प्रमाणात दिंडी चा आस्वाद आणि दहीहंडी कार्यक्रम आयोजित केले जात असतात.