बारी-माळी समाजाची अचलपुर मतदार संघात राहणार निर्णायक भूमिका, राजकीय पक्षाची समाजाची मनोधरणी सुरू

0
2058
Google search engine
Google search engine

बारी-माळी समाजाची अचलपुर मतदार संघात राहणार निर्णायक भूमिका,
राजकीय पक्षाची समाजाची मनोधरणी सुरू

बादल डकरे:-चांदुर बाजार

1962 पासून युतीचा मतदार अचलपुर मतदारसंघ हा भाजप कडे राहिला आहे.अनंत राव गुढे नंतर या मतदार संघात पुन्हा भाजप सेना युतीकडून या मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार सुनीता फिसके याना उमेदवारी मिळाली आहे.त्यामुळे भाजप एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची नाराजी सूर निघत आहे तर बारी समाज आणि माळी समाज याच्या मतदार संख्या ही या मतदार संघात निर्णायक ठरणार आहे.त्यामुळे कोणाचा पगडा भारी सध्या हे चित्र जरी स्पस्ट नसले तरी आमदार मीच होणार आल्याचे संकेत या आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद मध्ये दिले होते.

जवळपास या दोन्ही समाजाच्या मतदार संख्या की सारखीच असल्याने यावेळेस बारी समाज कडून उमेदवारी मागितली होती मात्र मतदार संघ शिवसेनेला गेले असल्यामुळे सर्वच राजकीय सूत्र बदलले गेले.मात्र भाजप सेना युती सोबत असणार बारी समाज हा युती धर्म पाळणार असल्याचे स्पस्ट झाले आहे .तर माळी समाज या वेळी काय करतील अशी चर्चा सुरू आहे.तर भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आणि महा आघाडी चे उमेदवार बबलू देशमुख यांच्या सहकार क्षेत्रात चागला परिचय आणि काही ठिकाणी सत्ता असल्याने याचा फायदा त्यांना या 2019 च्या विधानसभा निवडणूक मध्ये होतील का?माजी राज्य मंत्री वसुधाताई देशमुख याच्या महाआघाडी च्या नंतर हा मतदार संघ कॉग्रेस कडे राहिला आहे.तेव्हा पासून बबलू देशमुख हे कॉग्रेस चे अधिकृत उमेदवार राहिले आहे.

एकंदरीत या मतदार संघात बारी आणि माळी समाज जितका कॉग्रेस कडे आहे तितकाच प्रहार कडे आहे मात्र या दोघाचे तुलनेत भाजपा कडे याची मतदार सांख्य अधिक आहे.यावेळेस बारी समाज कडून उमेदवारी मागितली गेली त्यामुळे आता युती धर्म पळून कामाला सुरुवात केली तर भविष्यात या मतदार संघात बारी समाजाचा उमेदवारी साठी विचार करण्यात येतील असे जानकर यांचे मत आहे.तर युती धर्म हा कोण पाळणार आणि कोण नाही हे शोधून कॉग्रेस, प्रहार ,वंचित बहुजन आघाडी तर्फे सर्वांची मनोधारणा अचलपुर मतदार संघात सुरू आहे.तर काही जण आम्ही युती धर्म पाळणारच असल्याच्या भूमिकेवर ठाम आहे.