राष्ट्रसंताच्या चरण पादुका पालखीचे आकोट आगमन

90

अकोटःतालुका प्रतिनिधी :-

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षी पाटसुल रेल्वे ते गुरुकुंज आश्रम मोझरी पायदळ पालखी यात्रेचे आयोजन करण्यात येते या वर्षीदेखील अकोला मार्गावरील अशोक दादा मुंडगावकर यांच्या वाडीत राष्ट्रसंताच्या चरण पादुका पालखीचे आगमन शनिवार दि.१२ रोजी होत असून या मी निमित्त चरण पादुकांचे पूजन पालखीतील यात्रेकरूंचे स्वागत कथा गोपाल काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा राष्ट्रसंतांचा एकता ५१ वा पुण्यतिथी महोत्सव असल्याने पालखी व चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी करता गुरुदेव भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी उसळणार आहे.यानिमित्त पालखीचे स्वागत पूजन त्यासोबतच राष्ट्रसंतांच्या विचारांचा गाडा पुढे नेणाऱ्या गुरुदेव भक्तांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यातील काही पुरस्कारार्थी हे मरणोत्तर आहेत राष्ट्रसंतांच्या या चरण पादुकांचे दर्शन तथा पूजनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गुरुदेव भक्त अशोक दादा मुंडगावकर यांनी केले आहे. अकोट येथून पालखी पुढे वडनेर गंगाई येथिल पुढच्या मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।