*सोमवारी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी वरुडात – डॉ.बोंडे यांच्या विजयासाठी मराठी शाळेच्या मैदानात जाहीर सभा*

162

वरुड – भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रयत क्रांती संघटना, रिपाई, चे अधिकृत उमेदवार राज्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या प्रचार्राथ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी येत असून सोमवारी मराठी शाळेच्या मैदानांत त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई, रयत क्रांती संघटने चे अधिकृत उमेदवार तथा राज्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी हे वरुड शहरात दाखल होत असून त्यांची प्रचारसभा सोमवार दि १४ ला शहरातील मराठी शाळेच्या मैदानात संपन्न होणार आहे. गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघाचे डॉ अनिल बोंडे हे प्रतिनिधीत्व करीत असून त्यांनी मतदार संघात केलेल्या विकासकामांमुळे मतदार संघाचा नावलौकिक झाला. त्यांनी केलेली कामामुळे तसेच त्यांच्या अभ्यास पूर्ण वक्तृत्वाने त्यांनी सभागृहाही दणाणून सोडले आहे तसेच विरोधकांना नामोहरण करण्याच्या त्यांच्या विशिष्ठपूर्ण शैलीने त्यांनी लोकप्रियता मिळविली. त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी राज्य शासनाने याची दाखल घेत त्यांच्या खांद्यावर राज्याच्या कृषिमंत्री पदाची धुरा सोपविली. त्यांच्या रूपाने मतदारसंघाला गेल्या अठ्ठावीस वर्षाचा मंत्रीपदाचा वनवास संपला. त्यांच्या रूपाने मतदार संघाला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून दिली. मतदार संघाचा विकास हाच ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या ना. डॉ अनिल बोंडे यांचा विजय सुकर व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी सोमवारी शहरात दाखल होत आहे. सोमवार दि १४ ला दुपारी १ वाजता शहरातील मराठी शाळेच्या मैदानात ना.डॉ अनिल बोंडे यांच्या प्रचारासाठी ना. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित केली आहे या सभेला प्रचंड समुदायाने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई, रयत क्रांती संघटना यांचे वतीने करण्यात आली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।