दिव्यांग मतदारांची मतदान जनजागृती रॅली संपन्न

0
539
Google search engine
Google search engine

अकोट : ता.प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने दिव्यांग मतदार जनजागृती रँलीचे आकोटात आयोजन करण्यात आले. ही रॕली राष्ट्रीय अपंग विकास महासंघ संघटना तसेच रोटरी क्लब तथा निवडणूक विभाग यांच्या संयुक्त सहभागातून आयोजीत करण्यात आली होती.

याप्रसंगी मा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री.रामदास सिद्धभट्टी यांनी सर्व दिव्यांग तसेच अकोटवासी मतदारांना स्वत: रॅलीमध्ये सहभागी होऊन “”मतदार राजा जागा हो,लोकशाही चा राजा हो” अश्या घोषणा देऊन सर्व मतदारांना मतदानाची टक्केवारी वाढवा या आवाहनासह मतदानासाठीप्रोत्साहित केले.
शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत या रॅली द्वारे जनजागृती करत “मतदान करा मतदानाचा टक्का वाढवा “अश्या घोषणा देत मतदान जनजागृती करण्यात आली.यावेळी सर्व दिव्यांग मतदारांनी स्वयंस्फूर्तीने घोषणा व व्हिलचेअर वर स्वार होत दिव्यांग रॅलीत उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.रोटरी क्लब यांच्या सहकार्याने बनवण्यात आलेला मतदान जनजागृतीचा रथ यावेळी सर्व जनतेचे विशेष आकर्षण ठरला.यावेळी नायब तहसिलदार राजेश गुरव,रोटरी क्लब आकोट पदाधिकारी नंदकिशोरशेगोकार,संजयजी बोरोडे,शाम शर्मा,शिरिष पोटे,अँड. राजकुमार गांधी विशेष सहभागी सहकारी शरदभाऊ भगत सर(सचिव अपंग संघटना न प आकोट तथा बी एल ओ यांचेसह राष्ट्रीय अपंग संघटना पदाधिकारी संचालक गणेश वाकोडे,तालुकाध्यक्ष सुनिल बुंदेले,शहराध्यक्ष जब्बारशहारमजान शहा यांचेसह तंत्रस्नेही सिध्दांत वानखडे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आयोजन sveep नोडल अधिकारी मयुरी जोशी,सहा नोडल अधिकारी महेंद्र राऊत रितेश निलेवार ,चंद्रकांत घुगे मो. खान फिरोज , प्रा कायंदे सर श्रीकांत मर्दाने,प्रशांत मर्दाने यांनी केले.पोलिस विभागाचे विशेष सहकार्य लाभले