चांदूर  शहरात शासकीय कंत्राटदाराच्या घरी धाडसी चोरी – साडेसहा लाखांचा ऐवज व नगदी रक्कम लंपास

0
713
Google search engine
Google search engine
शहजाद खान/ चांदुर रेल्वे :-
ग्रीलच्या दाराचा कोंडा उघडून लाकडी दाराला छिद्र पाडून घरात प्रवेश केला व  कपाटामधील तसेच देवघरातील एतुण साडेसहा लाखांचे ऐवद व नगदी चोरून नेल्याची घटना चांदूर रेल्वे शहरातील संताबाई यादव नगरमध्ये १३ ऑक्टोंबर ला रात्री ११ वाजतापासुन ते १४ ऑक्‍टोबर सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली.
स्थानिक संताबाई यादव नगरमधील रहिवासी शासकीय कंत्राटदार नितीन राठी व त्यांचा परिवार रविवारी रात्री झोपले होते. अशातच मध्यरात्री लाकडी दाराचे कोंड्याजवळ सलाखीने दोन छिद्र पाडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. व देवाऱ्यात ठेवलेले सोन्याचे दागिने राणी हार ७० ग्रॅम, छोटा नेकलेस १२ ग्रॅम, चार सोन्याच्या अंगठ्या एकूण ११ ग्रॅम, एक सोन्याची चेन २० ग्रॅम, कानातील स्टाप्स ७ ग्रॅम असे एकूण १२० ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे ४ लाख ५६  हजार तसेच कपाटा मधील पाचशेचाया नोटांचे नगदी चार बंडल एकूण रक्कम २ लाख रुपये असा एकूण ६ लाख ५६ हजाराचा माल कोणीतरी अज्ञात चोराने लंपास केला. सकाळी उठल्यानंतर नितीन राठी यांना दार तुटलेले दिसले व देवघरातील कपाटाची पाहणी केली असता कपाट उघडे होते व कपाटामधील साड्या जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच कपाटाचे ड्रॉवर अर्धवट उघडे दिसले. त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता चोरी झाल्याचे निर्दशनास आले. लगेत त्यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र या प्रकरणात चोरट्यांनी छिद्र पाडून दारांमधून प्रवेश करतेवेळी घराच्यांना एकालाही जाग न आल्यामुळे अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधान आले होते.