पक्षाने घेतली बातमीची दखल…

0
1250
Google search engine
Google search engine

कॉंग्रेस पक्षाने घेतली आमच्या बातमीची दखल…
शेगांव:- दिनांक १३ आॅक्टोबर रोजी आम्ही बातमी प्रकाशित केली होती की काँग्रेस प्रचार राॅलीमध्ये महिलांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला.
परंतु काल शेगाव येथे काँगेस पक्षाने काढलेल्या राॅलीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. पूर्ण शहरात प्रचार दरम्यान गावातील काँग्रेस नेते जेष्ठ वरिष्ठ मंडळी तसेच कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन प्रचार करीत होते.
शेगांव शहरातील मेनरोड, शिवाजी चौक, येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राॅली पुढे निघाली नंतर गांधी चौक पासून राॅली जस जशी पालखी मार्गावर लागली राॅलीतिल कार्यकर्ते व नेते मंडळी कमी कमी होत गेली. मग फक्त उमेदवार व काही कार्यकर्ते च राहिले होते.