कडेगाव पलूस मतदार संघ विकास कामात राज्यात अग्रेसर: – आमदार डॉ. विश्वजीत कदम

0
567
Google search engine
Google search engine

कडेगाव :- हेमंत व्यास

कडेगाव पलूस मतदारसंघ हा विकास कामासाठी राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मतदारांनी पुन्हा संधी द्यावी असे आवाहन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केली कडेगाव तालुक्यातील चिखली शिवणी येथे प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी हिम्मत देशमुख बाळकृष्ण यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते
आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला त्यामुळेच कडेगाव पलुस मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा राहिला. येथील दुष्काळी भागाची नंदनवन करण्यासाठी ताकारी टेंभू सिंचन योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच सूतगिरणी साखर कारखान्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना नोकर्‍या दिल्या तसेच शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव दिला भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती केली तसेच नोकर्‍या दिल्या. अशा रीतीने मतदारसंघाचा चहूबाजूंनी विकास केला आहे .तर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आता मला पुन्हा नव्याने मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा करायचा आहे त्यासाठी मतदारांनी मला विक्रमी मताधिक्य देऊन पुन्हा या मतदारसंघाच्या विकास कामासाठी संधी द्यावी येत्या पाच वर्षात नव्याने विकास कामांची मांडणी केली जाणार आहे. तसेच अभिजीत दादा कदम अकॅडमीच्या माध्यमातून येथील विद्यार्थी हे आयपीएस आयएएस कशी बनतील यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. पलूस कडेगाव हे तालुके विक्रमी ऊस उत्पादन घेणारे व आयपीएस व आय ए एस अधिकाऱ्यांची तालुके अशी नवी ओळख निर्माण केली जाणार आहे. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम ,अॅड. एबी मदने, बाळासाहेब पवार, बापूसाहेब पाटील, जयदीप यादव, बी .के. कदम आदी मान्यवर व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.