*रयतेचे राहुल कडू रयतनामा घेऊन प्रचारात आघाडीवर*

0
985
Google search engine
Google search engine

*रयतेचे राहुल कडू रयतनामा घेऊन प्रचारात आघाडीवर*

अचलपूर विधानसभा मतदारसंघात सर्व सामान्य रयतेचे अपक्ष युवा उमेदवार राहुल कडू यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला असून त्यांच्या सभांना मतदारांनी दाद दिली आहे. त्यांनी प्रकाशित केलेला रयतनामा अचलपूर मतदारसंघात आकर्षणाचे केंद्र बनले असून रयत संघटणेचे युवा पिढीत असलेले जाळे राहुल कडू यांना घरा घरात पोहचवित आहे. अचलपूर मतदारसंघाचे व्हिजन २०१९ या माध्यमातून मतदारसंघात असलेल्या उणीवा विकासाचा निच्चाकं जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी गाव तेथे सभेचे आयोजन केले आहे.
राहुल कडू हे त्यांनी कुठलंही पद सत्ता नसतांना केलेल्या कामांचा पाठपुरावा जनतेसमोर ठेवत असुन सर्व सामान्य जनतेने त्यांना पाठिंबा दिला आहे.नेहमीच अपक्षांच्या पाठीमागे उभा राहणारा हा मतदारसंघ असुन युवा पिढी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करुन त्याचा पाठिशी राहतो.यावेळी तिंरगी दिसणार्या लढतीत आजच्या चित्रानुसार रयत ही आघाडीवर असुन नेमकं मतदार कौल कुणाच्या पारड्यात टाकणार हे तरी अद्याप गुलदस्त्यात आहे..