निवडणूक प्रचारादरम्यान चालू वाहनातून प्रचार सुरू निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दुर्लक्ष सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच लाऊड स्पीकरचा वापर करता येणार आहे.

0
793
Google search engine
Google search engine

निवडणूक प्रचारादरम्यान चालू वाहनातून प्रचार सुरू निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दुर्लक्ष

सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच लाऊड स्पीकरचा वापर करता येणार आहे.

चांदुर बाजार बादल डकरे

प्रचार, मिरवणुकांदरम्यान वाहनात लाऊड स्पीकर लावून घोषणाबाजी सुरू असते. यंदा मात्र चालत्या वाहनात प्रचारासाठी लाऊड स्पीकरचा वापर केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वाहन चालू असल्यास स्पीकर बंद ठेवण्याचे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले होते तरी मात्र अचलपुर मतदार संघात पक्षचा अनेक प्रचार हा चालू वाहनातून सुरू आहे या कडे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.तसेच कोणतीही कार्यवाही होत नसल्याने वाहनधारका हे आपलं चालू वाहनातून प्रचार जोरात सुरू ठेवत आहे.

सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच लाऊड स्पीकरचा वापर करता येणार आहे. शाळा, कॉलेज, परीक्षा केंद्र, सरकारी कार्यालये, मंदिर, मशिदीच्या जवळ त्याचा वापर करू नये. तसेच प्रचार, शोभयात्रेदरम्यान चालत्या वाहनातून स्पीकर वाजविण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच या काळात शासकीय व निमशासकीय विश्रामगृहाचा वापर निवडणुकीच्या कामासाठी करता येणार नाही. प्रचारादरम्यान छापील पुस्तिका तसेच पत्रकांमध्ये मुद्रक व प्रकाशक यांचे नाव, पत्ता व संख्या असणे बंधनकारक आहे. प्रकाशकाने परिशिष्ट अ मध्ये ते घोषित करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरदूत असताना देखील अध्यापही अचलपुर मतदार संघात कोठेच कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे.

उमेदवाराने काय करावे
च्मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना / निवडणूक लढविणाºया उमेदवारांना नि:पक्षपातीपणे उपलब्ध झाली पाहिजेत
च्इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रमापूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी.
च्सभेची जागा आणि वेळ याबाबत परवानगी घेणे बंधनकारक आहे.
च्मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये
च्मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या साध्या कागदावरच असाव्यात. त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये.

काय करू नये…
च्मतदाराला पैशांचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये.
च्मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये.
च्धार्मिक तसेच प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही.
च्मतदारांना लाच देणे, तसेच धमकावू नये.
च्इतर पक्षांच्या सभेच्या ठिकाणाहून मिरवणूक नेऊ नये.
च्ध्वनिवर्धकांचा पूर्वपरवानगीशिवाय वापर
करू नये.
असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी आणि माहिती उमेदवार याना दिली आहे.