गुरुकुंज मोझरी येथे ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवात राष्ट्रसंताच्या सहयोगींना मरणोत्तर जीवनगौरव

0
476
Google search engine
Google search engine

 

आकोटः ता.प्रतिनिधी
गुरदेव सेवाश्रम पाटसुल ता आकोट ते गुरुकुंज आश्रम येथे निघालेल्या राष्ट्रसंत चरण पादुका पायदळ पालखीचे आगमन गुरुकुंज मोझरी येथे दिनांक 18 ऑक्टोबर रोजी होत आहे.राष्ट्रसंतांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी पाटसुल ता.अकोट येथून दि.११ ला ही पालखी निघाली होती.गुरुकुंज येथील महोत्सवात याप्रसंगी राष्ट्रसंतांचे सहयोगी सर्वश्री स्वर्गीय महादेवराव गाडेकर व्यंकटराव मुंडगावकर मारोतराव गाडखे, पुरणसा माळवे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर आजीवन प्रचारक डॉ, उद्धवराव गाडेकर महाराज पाटसुल रेल्वे यांच्या कीर्तनाने पालखी यात्रा संपन्न होणार आहे या जीवनगौरव पुरस्काराचे आयोजन हे भारतीय सुवर्णकार समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र येरपुडे यांच्या तर्फे होत आहे.