आजपासून प्रचार बंद अधिकारी आणि कार्यकर्ते याची दमछाक दिवस रात्र एक करून कार्यकर्ते याचा गुप्त प्रचार आणि सभा सुरू

0
1356
Google search engine
Google search engine

आजपासून प्रचार बंद अधिकारी आणि कार्यकर्ते याची दमछाक
दिवस रात्र एक करून कार्यकर्ते याचा गुप्त प्रचार आणि सभा सुरू

चांदुर बाजार :-

आगामी विधानसभा निवडणूक आणि मतदान तारीख जवळ आली असून दिनांक 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान होणार आहे आणि 24 ऑक्टोबर ला निकाल लागणार आहे.आचारसंहिता काळात सुरू असल्याने मतदान 1 दिवस अगोदर सर्व प्रचार बंद झाला आहे.तर तिकडे ग्राम पातळीवरील मतदान स्लिप वाटप सुद्धा करण्यासाठी धावपळ सुरू आहे तर यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी हे दिवस रात्र एक करून त्याचे वाटप करत आहे.तर प्रचार बंद झाल्याने मूक प्रचार हा कार्यकर्त्यां तसेच उमेदवार याच्या कडून होणार असल्याचे दिसत आहे.

अचलपुर मतदार संघात परतवाडा, अचलपुर ,चांदुर बाजार या ठिकाणी दिनांक 8 ऑक्टोबर पासून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू झाला होता यात मोजकेच उमेदवार यांनी आपला प्रचार अधिकाधिक केला तर 11 पैकी फक्त 4 उमेदवार यांनी आपली प्रचार तोफ चांगली पेटवली होती तर बाकी उमेदवार याचा पाहिजे तसा प्रचार दिसला नाही.त्यामुळे आता अचलपुर मतदार संघात भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस महाआघाडी चे उमेदवार बबलू देशमुख, प्रहार जनशक्ती पक्षचे उमेदवार बच्चू कडू,शिवसेना युतीच्या उमेदवार सुनिताताई फिसके आणि रयत संघटना प्रमुख राहुल कडू याचा प्रचार हा मतदार संघात अधिक पाहायला मिळाला.

अचलपुर मतदार संघात निवडणूक तोफा आता बंद झाल्या असून कार्यकर्ते ही अधिक सक्रिय झाले असून यात आपल्याला अधिकाधिक मत मिळावे या साठी गुप्त बैठक सुद्धा सुरू होणार आहे.नाराज असलेल्या कार्यकर्ते यांची मनोधरणी तसेच अनेक मोठे आश्वासन देऊन अधिक जास्त मध्ये आपल्याला कसे मिळतील याचा प्रयत्न उमेदवार तसेच कार्यकर्ते याच्या पाहायला मिळणार आहे.तर मतदार संघात ड्रॉ राजेंद्र गवई यांनी तसेच ऍड.नंदेश अंबाडकर यांनी सुद्धा आपला प्रचार थांबविला असल्याचे दिसून आले.तर एएमआयएएम चे उमेदवार अब्दुल रौफ याचा सुद्धा प्रचार काही प्रमाणात मतदार संघात दिसुन आला.

ड्रॉ. राजेंद्र गवई यांनी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस कडून उमेदवार मागितली होती मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केली मात्र त्यांनी बॅनर लावले मात्र प्रचार न केल्याने त्याची राजकीय खेळी काय अध्यपही स्पस्ट नाही असाच काही प्रकार adv नंदेश अंवाडकर याच्या बाबत सुद्धा पाहायला मिळाले. तर आमदार बच्चू कडू याच्या विरोधात बबलू देशमुख, राहुल कडू,सुनीता फिसके यांनी प्रचार केला तसेच राहुल कडू यांनी बबलू देशमुख याच्यावर सुद्धा आपले टिकेचे शस्त्र चालवले.तर राहुल कडू या नव्या चेहऱ्याला 3 उमेदवार याच्या प्रमाणे सुद्धा चागला प्रतिसाद पाहायला मिळाला.

या मतदार संघातील चौरंगी लढत मध्ये प्रचारात होती मात्र निवडणूक रिगणात या लढतीचे अधिक स्पस्ट चित्र समोर येणार आहे.सध्या आज पासून प्रचार बंद असल्याने पोलिस आणि निवडणूक विभाग सुद्धा कार्यकर्ते आणि उमेदवार याच्या प्रत्येक हालचाल वर नजर ठेवणार आहे.