अवैध पणे होत असलेली वाळू वाहतूक वर स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यवाही,तर पोलीस यांनी केलेल्या कार्यवाही वर महसूल विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग याची मूक संमती

346

अवैध पणे होत असलेली वाळू वाहतूक वर स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यवाही,तर पोलीस यांनी केलेल्या कार्यवाही वर महसूल विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग याची मूक संमती

चांदुर बाजार :-

स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ला मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे त्यांनी चांदुर बाजार तालुक्यातील ग्राम घाटलाडकी पोलीस स्टेशन ब्रा. वाडा येथे अवैद्य विना परवाना रेती वाहतूक सुरू आहे अशी माहिती वरून स्थनिक गुन्हे शाळेच्या पथक याना मिळली त्याच्या आधारावर यांनी कारवाई केली असता नदी पात्रात वाळू (रेती)चोरी करतांना एक ट्रक्टर मिळून आला सदर कारवाई तील फरार आरोपी 1) रिजावन अहमद अब्दुल नसीर रा. घाटालाडकी व इतर 5 आरोपी यांचे विरुद्ध कारवाई करून नदी पात्रातून वाळू चोरी केलेली ट्रकर ट्रॉली सह कीं अं. 4,04000 रु. चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.सदरची कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी व अप्पर ग्रामीण पोलीस अधीक्षक शाम घूगे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील किनगे साहेब, सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद एस.कवाडे, नाईक पोलीस कॉस्टबल गजेंद्र ठाकरे , नाईक पोलीस कॉस्टबल प्रमोद खर्चे, नाईक पोलीस कॉस्टबल योगेश साभारे पोलीस कॉस्टबल प्रवीण अंबावडकर चालक सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश माणडोकर यांनी केली आहे.

या आधी सुद्धा चांदुर बाजार पोलिसांनी अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाहरणावर कार्यवाही केली यामध्ये स्थानिक चांदुर बाजार तहसील प्रशासन याना कार्यवाही बाबत पत्रव्यवहार केला मात्र चांदुर बाजार महसूल प्रशासन कडून काहीच कार्यवाही केली नाही.आणि विना नंबर ट्रॅकतर सोडण्यात आले मात्र दोन दिवसांनी चांदुर बाजार पोलिसांनी पुन्हा कार्यवाही करून तोच ट्रॅक्टर पकडले मात्र महसूल विभाग फक्त बघणाऱ्याची भूमिका घेत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर प्रादेशिक परिवहन विभाग याना विना नंबर कसे वाहतूक परवानगी मिळत आहे याबत सुद्धा पत्रव्यवहार केला मात्र काहीच कार्यवही झाली नसल्याचे चांदुर बाजार पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली.