जिल्ह्यात महायुतीची श्री प्रताप अडसड यांनी राखली लाज – १७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

0
1447
Google search engine
Google search engine

धामणगावात “प्रतापपर्व” उदयास

प्रताप अडसड ९ हजार ५१७ मतांनी विजयी, वीरेंद्र जगतापांचा दारूण पराभव

चांदूर रेल्वे : (शहजाद खान)

अमरावती जिल्ह्यात कृषीमंत्र्यांसह भाजपाच्या सर्वच आमदारांना मतदारांनी नाकारले असता धामणगावातुन महायुतीचे प्रताप अडसड यांनी दणदणीत विजय मिळवित महायुतीची जिल्ह्यात लाज राखली आहे. त्यामुळे आता “प्रतापपर्व” उदयात आले आहे. धक्कादायक निर्णय देणारा मतदार संघ म्हणून ख्याती असलेल्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात भाजपचे नवखे व युवा उमेदवार प्रताप अरूण अडसड यांनी काँग्रेसचे प्रा. वीरेंद्र जगताप यांना धोबीपछाड देत मतदार संघावर भगवा फडकविला.

    चांदूर रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १४ टेबलवर सकाळी ८ वाजतापासुन मतमोजणीला सुरूवात झाली होती. मागील ३ टर्मपासुन या मतदार संघावर काँग्रेसची असलेली अविरत सत्ता या विजयाने खंडीत करीत मतदारांनी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना नाकारत जोरदार धक्का दिला आहे. या मतदार संघात भाजप, काँग्रेस व वंचीत बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत झाली. यामध्ये भाजपचे प्रताप अरूण अडसड यांनी काँग्रेसचे प्रा. वीरेंद्र जगताप यांचा ९ हजार ५१७ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत प्रताप अडसड यांना ९० हजार ८३३ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रा. वीरेंद्र जगताप यांना ८१  हजार ३१६ मते मिळाली. तर वंचीत बहुजन आघाडीचे निलेश ताराचंद विश्वकर्मा यांना २३ हजार ७८० मतांवर समाधान मानावे लागले. अत्यंत अटीतटीची झालेल्या या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून भाजपचे प्रताप अडसड यांनी आघाडी घेतली होती ती शेवटपर्यंत कायम होती. यामूळे काँग्रेसच्या गोटात सुरूवातीपासून धुकधूक सुरू झाली होती. खुद्द प्रा.वीरेंद्र जगताप काऊंटींग सेंटर जातीने हजर होते. ऐवढेच नव्हे तर प्रत्यक्ष काऊंटींग टेबलवर जाऊन मताची शहनिशा करतांना दिसले. चांदूर रेल्वे तालुक्यात वंचीत बहुजन आघाडीच्या निलेश विश्वकर्मा यांनी भाजप व काँग्रेसच्या बरोबरीचे मते घेतली. शेवटच्या फेरीपर्यंत भाजपने घेतलेली आघाडी कायम होती आणि फेरीगणीक आघाडीत वाढ होतांना दिसत होती. भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीत आमदार प्रताप अडसड यांची ढोल ताश्यांच्या गजरात चांदूर रेल्वे शहरातून विजयी मिरवणुक काढली. या विजयाचा जल्लोष संपूर्ण मतदार संघात होतांना दिसत होता. या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एसडीओ रणजित भोसले, सहाय्यक म्हणून तहसीलदार राजेंद्र इंगळे(चांदूर रेल्वे), भगवान कांबळे(धामणगाव रेल्वे) व प्रशांत भोसले(नांदगाव खंडेश्वर) यांच्यासह सर्व महसुल कर्मचाऱ्यांनी चोख काम बजावले. चांदूर रेल्वेचे एसडीपीओ सोमनाथ तांबे, ठाणेदार संतोष भंडारे यांसह सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड, आरपीएसएफ व एसआरपीच्या जवानांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. पोस्टल मतदानामध्ये शासकीय कर्मचारी सुध्दा भाजपाचे प्रताप अडसड यांच्या पाठीशी उभे असल्याचे मत मोजणीतून पहायला मिळाले. अडसड यांना ४३९ तर काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांना ३३५ तसेच  वंचीत बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना ७९ मते प्राप्त झाली. यात चार मते रद्द ठरविण्यात आली. रिंगणात असलेल्या १७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या निवडणूकीत  ७८८ जणांनी नोटांचा वापर केला आहे़

वंचितचा काँग्रेसला फटका ?

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी या निवडणुकीत जोरदार ताकद लावली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या चांदूर रेल्वे शहरात वंचितने भरघोस मते घेतली. तसेच अनेक गावांत मोठ्या प्रमाणात मते प्राप्त केली. यामुळे वंचितचा फटका काँग्रेसला बसल्याची चर्चा सुरू होती.

धामणगाव विधानसभा मतदार संघात उमेदवारांना पडलेली मते

     उमेदवार                           मिळालेली मते
प्रताप अरूणभाऊ अडसड  – ९०८३३
वीरेंद्र वाल्मीकराव जगताप – ८१३१६
सविता भीमराव कटकतलवारे – २१९६
उत्तमराव जंगलुजी गवई – २२९
हर्षवर्धन बळीरामजी खोब्रागडे – २२२
वासुदेव काशीनाथ चौधरी – २४७
विशाल उत्तमराव घाडगे – ४१८
निलेश ताराचंद विश्वकर्मा – २३७८०
सुनिता विजय रायबोले  – २३५
अभिजित प्रविण ढेपे – २५५३
गौरव सुधाकर सव्वालाखे – २२९
नानासाहेब उर्फ चंद्रदीप शंकरराव डोंगरे – ४०५
प्राविण्य प्रमोद देशमुख – २२४
निलम देवीदास रंगारकर  – २३९
प्रविण दिनकरराव घुईखेडकर  – २६६८
फिरोज खान गफ्फार खान पठाण – १०३०
मारोती नामदेवराव सहारे – ९८८
शैलेश दिवाकर रोहणकर – ८४३
अवधुत विश्वनाथ सोनवणे  – २४९
संदीप बाबुलाल मेश्राम  – १३३
नोटा  – ७८८
एकुण मते (पोस्टल मतांसहित) – २०९८२५