सत्तास्थापने साठी सोशल मीडियावर धुमाकूळ

0
558
Google search engine
Google search engine

सत्तास्थापनेचा संघर्ष राज्यात सुरु आहे तसा तो सोशल मीडियावरही सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरात गुगलवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सर्वाधिक सर्च केले गेले आहे. तर त्यापाठोपाठ काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्च केले गेले आहे. विशेष म्हणजे सत्तास्थापनेच्या राजकारणात पवारांनीच सर्व सुत्रे त्यांच्याकडे ठेवली होती.