श्रीराम हे राष्ट्रपुरूष, रामजन्मभूमी हा स्वाभीमानचा विषय – विहिंपचे मिलिंद परांडे

0
586
Google search engine
Google search engine

शबरीला अय्यप्पा मंदिरातील परंपरा म्हणजे लिंगभेद नाही.

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – केंद्र सरकार हिंदू आस्थेचा विचार करून श्रीराम जन्म भूमीवर पुढच्या ०३ महिन्यांमध्ये एक योग्य व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्माण करेल आणि राम मंदिराच्या कार्याला लवकरच गती मिळेल असे विश्व हिंदू परिषदचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी शिव कोळीवाडा येथे विश्व हिंदू परिषदेचे स्व.अशोक सिंघल रुग्ण सेवा सदनाच्या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये प्रतिपादन केले असून विश्व हिंदू परिषद किंवा श्रीराम जन्मभूमी न्यासांनी अर्थसंग्रह करता सद्या कोणतेही आव्हान केले नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी परांडे म्हणाले की, श्रीराम हे राष्ट्रपुरूष असून रामजन्मभूमी हा राष्ट्रीय स्वाभीमानाचा विषय आहे. देशातील करोडो लोकांच्या घरात श्रीराममंदिराचे जे संकल्पचित्र पोहोचले आहे. त्या संकल्पचित्राप्रमाणेच प्रत्यक्षातील राममंदिर उभे राहावे अशी मागणी त्यानी यावेळी केली. श्रीरामजन्मभूमीवर बाबरी ढाच्याच्या ठिकाणी 12 व्या शतकातील वैष्णव मंदिराचे अवशेष सापडल्याचे न्यायालयात वैज्ञानिक आधारावर सिद्ध झाले आहे, असे त्यानी सांगतिले. मुस्लिम पक्ष या जागेचा ताबा सिद्ध करू शकलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. महात्मा गांधींनी सोमनाथ मंदिरावरून जे आवाहन मुस्लिम समाजाला केले होते की, विदेशी आक्रमकांशी येथील मुस्लिमांनी नाते ठेवू नये तर येथील राष्ट्रपुरूषांशी स्वत:ला जोडून घ्यावे, तोच विषय श्रीरामजन्मभूमीला लागू होतो असे मिलिंद परांडे म्हणाले. बाबर हा विदेशी आक्रमक होता हे लक्षात ठेवले पाहीजे असे ते म्हणाले. अयोध्यातील प्रस्तावित श्रीराम मंदिर हे सरकारी मंदिर बनता कामा ने, ते हिंदू समाजाच्या, साधू संताच्याच ताब्यात राहिले पाहिजे असे विश्व हिंदू परिषदेची ठाम भूिमका आहे असेही मिलिंद परांडे म्हणाले. सध्या रामजन्मभूमीवरील या प्रस्तावित मंदिरासाठी कुठलेही निधीसंकलन सुरू नाही असेही त्यानी सांगितले. या मंदिरासाठी करोडो लोकांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात जो निधी दिला, त्यातून मंदिराच्या दगडी स्तंभ व इतर भागांचे कोरीव काम सुरू असून हे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे अशी माहितीही त्यानी दिली

शबरीला अय्यप्पा मंदिरातील परंपरा म्हणजे लिंगभेद नाही.


शबरीमला येथील अय्प्पा मंदिरातील विशिष्ट वातील स्त्रीयांना प्रवेशबंदीची परंपरा म्हणजे लिंगभेद नसून ती फक्त एकाच मंदिरापुरती असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यानी केले. शिव कोळीवाडा येथे विश्व हिंदू परिषदेचे स्व.अशोक सिंघल रुग्ण सेवा सदनाच्या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. अशा समाजाच्या आस्थेच्या विषयात न्यायालयाने लक्ष घालावे का हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयानेच उपस्थित केला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीराम हे राष्ट्रपुरूष असून त्यांचा तसाच स्वीकार केला पाहिजे असेही परांडे यांनी यावेळी सांगितले. श्री राम मंदिरासाठी कुठलेही निधीसंकलन सध्या सुरू नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी परांडे यानी म्हणाले की, शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात देशातील सर्वाधिक तिर्थायात्री जातात. वर्षाला साडेपाच ते सहा कोटी भाविक या ठिकाणी येतात. त्यांच्या आस्थेचा हा प्रश्न आहे. हे मंदिर सोडून इतर कुठलही अय्प्पा मंदिरात स्त्रीांना प्रवेश बंदी नाही अशी माहिती त्यांनी दिली. हा लिंगभेदाचा विषयच नाही असे सांगून मिलिंद परांडे यांनी या प्रकरणा मागे मोठे षडंत्र असल्याचा आरोप केला. आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ परांडे यांनी सांगितले की, केरलचे कम्युनिस्ट नेते नंबुद्रीपाद यांनी पन्नास वर्षांपूर्वीच हे सांगून ठेवले आहे की, केरळमधे कम्युनिझम वाढवायचा असेल तर शबारीमला येथील अय्यप्पा मंदिराच्या परंपरा तोडाव्या लागतील. अगदी असेच मत मिशनर्यांनी केरळमधे ख्रिस्ती धर्मप्रसारासंदर्भात नोंदवलेचीही माहिती परांडे यांनी दिली. त्यामुळे शबरीमला येथील महिलांच्या मंदिर प्रवेशाचे प्रकरण हे हिंदू आस्था तोडण्यासाठी उभे केले गेले आहे असे म्हणण्यास पूर्ण वाव आहे असे परांडे म्हणाले. गेल्या वर्षभरात पोलिसांनी शबरीमला येथे हिंदू भाविकांवर भीषण अत्याचार केले आहेत असे सांगून मिलिंद परांडे म्हणाले की, 40 हजार हिंदूविरोधात खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. महिंलांवरही पोलिसांनी हात उगारला आहे. केरळ शासनाने हे हिंदुविरोधी अत्याचार ताबडतोब थांबवले पाहिजेत अशी मागणी परांडे यांनी केली.