पंकजा मुंडेंनी सत्ताकाळात राबवलेल्या योजनांमुळे बीड जिल्ह्यावर असलेला ‘स्त्रीभ्रूण’ हत्येचा कलंक पुसला गेला

0
604
Google search engine
Google search engine

बीड परळी – एकेकाळी राज्यात स्त्रीभ्रूण हत्येचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हा राज्यात सगळ्यात कमी होता.मात्र,आता मुलींच्या जन्माचा टक्का वाढला आहे.बीड जिल्हा हा आता राज्यातील मुलींच्या जन्मदरामध्ये अग्रस्थानी जिल्ह्यांमध्ये जाऊन बसला आहे.हाती आलेल्या वैद्यकिय अहवालानुसार आता बीड जिल्ह्यात 1000 मुलांमागे तब्बल 961 मुली आहेत.

2014 भाजपचे सरकार आल्यानंतर बीड जिल्हाच्या आ.पंकजा मुंडे यांच्या रूपाने महिला नेतृत्वास मंत्रीपद मिळाले.त्यात महिला व बालकल्याण खाते पंकजा मुंडे यांना भेटल्यामुळे बीड जिल्हात पंकजा यांनी महिला सक्षमीकरण आणि स्त्रीभ्रुण हत्येबाबत कठोर पाऊले उचचली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ अशा विविध योजना राज्यासह जिल्हाभरात राबवल्या.त्यामुळे मुलींच्या या जन्माचं संरक्षण होऊ लागले.आणि त्याचा परिमाण आता वाढलेल्या मुलींच्या जन्मदराच्या रूपाने दिसू लागला आहे.

याच सोबत जिल्हातील आरोग्य यंत्रणा,प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार यांनी पुढाकार घेत ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यांमध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत होऊ लागले आहे.जनजागृती निर्माण केली.यामुळे बीड जिल्हाला स्त्रीभ्रूण हत्येचा लागलेला कलंक पुसून काढला गेला.

कसा वाढला मुलींचा जन्मदर?

सन 2010 – 2011 मध्ये 1000 मुलामागे फक्त 810 मुली

सन 2015 – 2016 मध्ये 1000 मुलामागे  898 मुली

सन 2016 – 2017 मध्ये 1000 मुलामागे  927 मुली

सन 2017 – 2018 मध्ये 1000 मुलामागे 936 मुली

सन 2018 – 2019 मध्ये 1000 मुलामागे तब्बल 961 मुली