मुलानेच केला बापाचा खून ; उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

0
679
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद / प्रतिनिधी

दगडु साधु लाकाळ, वय 48 वर्षे, रा. पळसप, ता. उस्मानाबाद हे व्यसनी असल्याने नशा करुन पत्नी अनिता हिस नेहमी त्रास देत असत. दि. 19.11.2019 रोजी रात्री 09.30 वा.सु. दगडु लाकाळ हे नशेत असतांना पत्नीस मारहाण करत होते. हा प्रसंग त्यांचा मुलगा दादा (बालाजी) दगडु लाकाळ याने बघितला वडील आईला मारत आहेत. या रागातुन त्याने वडिलांच्या डोक्यात काठी मारली यात त्यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या अनिता दगडु लाकाळ यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द पोलीस ठाणे, ढोकी येथे भा.दं.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दि. 20.11.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.