ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन एका मुलाचा मृत्यु ; उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

0
795
Google search engine
Google search engine

ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन एका मुलाचा मृत्यु.

उस्मानाबाद / प्रतिनिधी

राकेश जनार्धन कांबळे रा. वरवंटी, ता. उस्मानाबाद याने दि. 16.11.2019 रोजी 12.00 ते 01.00 वा.सु. मौजे वरवंटी येथे शेतात मशागतीच्या वेळी रोटर लावलेला ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवला. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेला पृथ्वीराज संतोष बेद्रे, वय 13 वर्षे, रा. वरवंटी, ता. उस्मानाबाद हा ट्रॅक्टरच्या पाठीमागे जोडलेल्या रोटरमध्ये अडकुन त्याचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या संतोष मल्लीकार्जुन बेंद्रे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण) येथे भा.दं.वि. कलम 279, 304 (अ) सह मो.वा.का कलम 134 (ब) प्रमाणे गुन्हा दि. 20.11.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.