सेवेतला आनंद जीवन फुलवितो – श्री नानासाहेब हिंगणकर ● मुकुंदराव गावंडे यांनी देहदान संकल्प करुन साजरा केला अभिष्टचिंतन सोहळा

0
619
Google search engine
Google search engine

आकोट (प्रतिनिधी )
जीवनात आपल्याकडे आलेल्या जबादा-या कर्तव्यनिष्ठेने पार पाडल्यास या सेवेतला आनंद आपलं जीवन सुंदरतेने फुलवितो.शिवश्री मुकूंदराव गावंडे यांचे कृतार्थ जीवनातून हा आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असे गौरवद् गार जिल्हा सहकारी बॕकेचे माजी अध्यक्ष जेष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांनी काढले.

जिल्हा सहकारी बॕकेचे सेवानिवृत्त उप मुख्य अधिकारी शिवश्री मुकूंदराव गावंडे यांचे एकाहत्तरी निमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात नानासाहेब हिंगणकर बोलत होते याप्रसंगी जिल्हा सहकारी बॕकेचे माजी मुख्यअधिकारी बी जे काळे,मुख्यअधिकारी अनंत वैद्य,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पटोकार, विनायकराव मोडसे,नानासाहेब गावंडे,एम.व्ही गावंडे नागपूर,डाॕ राजेश नागमते,दिलिप बोचे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कौटूंबिक सोहळ्यात मुकूंदरा व सौ.शिलाताई गावंडे यांचा नानासाहेब हिंगणकर व सौ.उषाताई हिंगणकर यांचे हस्ते हृद्य सत्कार पार पडला.विविध संस्था व संघटनांचे वतीने तथा वैयक्तिकरित्या मुकूंदराव गावंडे यांचे एकाहत्तरी निमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.

शिवमती मृदुला गावंडे व रेणू गावंडे यांनी गायिलेल्या जिजाऊ वंदनेने या सोहळ्याला प्रारंभ झाला.याप्रसंगी बी जे काळे,विनायकराव मोडसे,नानासाहेब गावंडे,डाॕ राजेश नागमते,भगवंतराव गावंडे ,प्रमोद हिंगणकर,डाॕ शेखर गावंडे आदींनी मुकूंदराव गावंडे यांचे जीवन पैलू उलगडत त्यांना शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर हिंगणकर यांनी केले तर आभार प्रा.सागर गावंडे यांनी मानले.डाॕ.सुवर्णा गावंडे,सौ.वैशाली गावंडे व सौ.वृषाली मुडे यांनी उपस्थितांचे आदरातिथ्य केले.

यावेळी जिल्हा सहकारी बॕकेचे अधिकारी- कर्मचारी,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,नजिकचे नातेवाईक आप्तेष्ट,हितचिंतक मित्रपरिवार व गावंडे परिवार उपस्थित होता.चि.आरव गावंडे यांचे पसायदानाने या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.

*मरणोत्तर देहदानाचा संकल्प*

जिल्हा सहकारी बॕकेचे माजी उपमुख्यअधिकारी शिवश्री मुकूंदराव गावंडे यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून मरणोत्तर देहदानाचा संकल्प जाहीर केला.
मृत्यूनंतर आपला देह वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी यावा.यासाठी त्यांनी अकोल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव सादर करुन प्रमाणपत्र प्राप्त केले.या संकल्पातून त्यांनी सामाजिक जाणिवांचा उत्कट परिचय घडविला आहे.त्यांचे अभिनंदन होत आहे.
—————————————