शिक्षणाचे महत्व शिक्षणाव्यतिरिक्त कळणे असंभव …

0
744
Google search engine
Google search engine

शिक्षणाचे महत्व शिक्षणाव्यतिरिक्त कळणे असंभव …
शेगांव:- आज २ जी ३ जी ४ जी चा काळ असला तरीही गुरुजी शिवाय काहीच होत नाही हीच दुरदृष्टी ओळखुन
1942 मध्ये शेगावचे शिक्षण महर्षी इंदर मलजी मुरारका यांनी येत्या काळाला ओळखून, माझ्या शहरातला मुलगा ,मुलगी शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर ,तहसीलदार, कलेक्टर, व इतर उच्च पदावर जाऊन माझ्या गावाचं नाव कसं जगभर पोहचवेल हे जाणून शेगावी इंग्रजांच्या काळातच शिक्षणाचे एक छोटेसे रोपटे लावलं होतं.

आज शेगाव मध्ये ते छोटस रोपट आज त्याचे मोठे वृक्ष झालेलं असून आज इंदरमन मुरारका यांच्या नावाने शेगावात निशुल्क महाविध्यालया पर्यत शिक्षण दिल्या जाते, त्यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात या शिक्षण संस्थांमध्ये साजरा केला जातो. या सोहळ्यामध्ये विद्यार्थी खेळ नृत्य आणि हस्तकला द्वारे नवीन नवीन वस्तू तयार करतात, प्रदर्शनी लावता़त.
आलेले अतिथी गण विद्यार्थ्यांना संभाषीत करून त्यांचे बौद्धिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि क्रीडा क्षेत्राचा विकास कसा होईल यावर भर देतात हा सोहळा पालक व शिक्षक मेळावा म्हणून साजरा होत असतो, दर वर्षी दिनांक 24 ते 26 नोहेंबर या काळात हा साजरा केला जातो.
कार्यक्रमामध्ये व्यवस्थापक नंदकिशोर जी मुरारका
तर अतिथी म्हणुन आॅ. शेषराव काळे जिल्हा व सत्र न्यायालय बुलढाणा, प्राध्यापक ताराचंद जी कंठाळे यवतमाळ, ह-भ-प सुशील दादा वनवे शेगाव, सुरेंद्र कुमार मिश्रा क्रीडाशिक्षक तुलसी बाई झांबड विद्यालय नांदुरा, यांनी येऊन विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन केलं आणि विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगितले.
यावेळी विविध कार्यक्रमात खेळात उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले, या कार्यक्रमाकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पंडित मॅडम तसेच संजय कुमार जी मुरारका आणि संपूर्ण शिक्षक वृदांनी प्रयत्न केले आणि अतिशय चांगल्या रीतीने हा शिक्षक व पालक मेळावा पार पाडला.