चांदुर बाजार येथे मतिमंद मुलीवर अत्याचार ,सिने स्टाईल ने आरोपीला 1 तासात अटक

0
911
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथे मतिमंद मुलीवर अत्याचार ,सिने स्टाईल ने आरोपीला 1 तासात अटक,पोलिसांची कार्यवाही नागरीक मध्ये तीव्र संतोष

शशिकांत निचत :-प्रतिनिधी

चांदुर बाजार तालुक्यातील जसापूर येथील जनावर च्या गोठ्यात मतिमंद मुलीवर अत्याचार झाली असल्याची घटना दिनांक 24 नोव्हेंबर ला रात्री 8.30 च्या दरम्यान घडली असून घटनेची माहिती मिळताच मुलींचा आई कडून याची दिनांक 25 नोव्हेंबर ला स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये मध्ये धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली. पीडित मुलीच्या आई च्या तक्रार वरून पोलिसांनी आरोपीचे लोकेशन तपासून त्याला सिने स्टाइल ने अटक केली.

मुलीच्या आईच्या तक्रार वरून चांदुर बाजार पोलिसांनी आरोपी मनीष गजानन साबळे वय 23 वर्षे रा. जसापूर याचे तपास सुरू केला त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून चांदुर बाजार शहरातील देशी दारू च्या दुकान मधील लाइन मध्ये आरोपी असल्याचे पोलिसांना माहिती मिळाले. त्या आधारे त्यानिआरोपी हा आपल्यला ओळखेल यावरून चांदुर बाजार चे खुफिया विरेंद्र अमृतकर आणि विनोद इंगळे यांनी आपला खरी ओळख लपवून आणि विरेंद्र अमृतकर यांनी अपंग असल्याचे दाखव आरोपी जवळ गेले आणि त्याला ताब्यात घेतले. घटनेची तीव्रता पाहता अचलपुर उपविभागीय अधिकारी यांनि पोलीस स्टेशन गाठले आणि चौकशी करून आरोपी वर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि 376(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.घटना स्थळी चांदुर बाजार चे ठाणेदार उदयसिंग साळूके सहायक पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्यय,तेजस्विनी गिरसावडे यांनी भेट दिली.तर या घटनेमुळे चांदुर बाजार तालुक्यातील जनते मध्ये मोठया प्रमाणावर रोष पाहायला मिळाला आहे.तर या प्रकरण मध्ये पीडित मुलीची तपासणी होणार असल्याचे पोलीस सूत्र कडून माहिती मिळाली.
सदर प्रकरणाचा तपास जिल्हा ग्रामीण पोलीस अमरावती ड्रॉ. हरी बालाजी एन, यांच्या मार्गदर्शनाखाली खाली अचलपुर पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे ठाणेदार उडायसिग साळूके,
सहायक पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्यय,तेजस्विनी गिरसावडे पोलीस कॉस्टबल विरेंद्र अमृतकर, विनोद इंगळे,दिलीप नादुरकर प्रशांत भटकर यांनी केला.

प्रतिक्रिया:-
अश्या प्रकारचे कृत हे संताप येण्याजोगे आहे.यावर लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून संबंधित आरोपी ला कठोर शिक्षा करावी. या घटनेमुळे महिला यांच्या सुरक्षा चा प्रश्न हा चिंतेचा विषय आहे.
1)आनंद अहिर नगर सेवक नगर परिषद

कायद्या मध्ये असे कृत करणाऱ्या साठी जितकी जास्त शिक्षा असेल तितकी अश्या लोकांना दिली पाहिजे.तेव्हाच अश्या प्रकारचे गैर कृत्य याला चागला आळा बसेल .
2)मनोज कटारिया सामाजिक कार्यकर्ते

ही घटना फार घृणास्पद आहे. या मुळे तालुक्यातील महिला मध्ये मोठ्या प्रमाणावर संताप तर आहे.यामध्ये असे कृत्य करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हे अपेक्षित आहे.
3)अर्चना निचत सामाजिक कार्यकर्ते

तक्रार ची गंभीर दखल घेत आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.पुढील तपास हा वरिष्ठ अधिकारी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सुरू आहे.
4)पोपट अबदगिरे पोलीस उपविभागीय अधिकारी अचलपुर