वाहतूक कर्मचाऱ्यांचा माणुसकीचा ओलावा ◆ सेवानिवृत्त व्यक्तीस सोपवली पेन्शनची हरवलेली कागदपत्रे

0
545
Google search engine
Google search engine

अकोलाः संतोष विणके :-

अकोला शहरातील सर्व महत्वाच्या प्रमुख रस्त्यांचे बांधकाम एकाच वेळेस सुरू असल्याने व उपलब्ध रस्ता व वाहनांची भरमसाठ संख्या पाहता वाहतूक सुरळीत रहावी ट्राफिक जाम लागू नये म्हणून वाहतूक कर्मचाऱ्याला सतत हजर राहून डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागते, थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी वाहतूक खोळंबते , परंतु अश्या परिस्थिती मध्ये सुद्धा माणुसकी जिवंत ठेवून आपले कर्त्यव्य चोख बजावून सेवा निवृत व्यक्ती चे अत्यंत महत्वाचे हरविलेले कागदपत्रे कोणताही पत्ता व संपर्क क्रमांक उपलब्ध नसतानाही शोध घेऊन त्याला कागदपत्रे परत करण्याची माणुसकी शहर वाहतूक कर्मचाऱ्यांनी दाखवली, दिनांक 25।11।19 रोजी शहर वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी आश्विनी माने आणि पूजा दांडगे ह्या सिव्हील लाईन चौकात आपले कर्त्यव्य पार पाडत असतांना त्यांना काही कागदपत्रे रस्त्यात पडलेली दिसली, ते कागदपत्रे सेवानिवृत्ती वेतनाशी संबधीत महत्वाची कागदपत्रे असल्याचे दिसून आल्याने त्यांनी प्रथम कागदपत्रे घ्यायला कोणी परत येतो का हे बघितले, परंतु संध्याकाळ पर्यंत कोणीही न आल्या मुळे व त्या कागदपत्रांवर कोणताही पत्ता किंवा संपर्क क्रमांक नसल्याने त्यांनी सदर कागदपत्रे शहर वाहतूक कार्यालयात जमा केले, पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्यावर बँकेचा खाते क्रमांक दिसून आला, त्यांनी शहर वाहतूक शाखेचे विशाल पांडे व कृष्णा मुंढे ह्यांना बँकेत जाऊन खाते क्रमांकावर पत्ता व संपर्क क्रमांक शोधण्यास सांगितले, त्या वरून संपर्क क्रमांक प्राप्त करून माहिती घेतली असता, सदर कागदपत्रे सेवा निवृत्त कर्मचारी प्रभाकर बळीराम काटकर ह्यांचे असल्याचे समजल्या वरून त्यांचे सोबत संपर्क करून त्यांना कागदपत्रे सापडल्याचे सांगताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण ह्या कागदपत्रां शिवाय त्यांचे पेन्शन निघू शकले नसते, त्यांना शहर वाहतूक शाखे मध्ये बोलाविले असता त्यांनी वाहतूक कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करून सोबत पेढे आणून कार्यालयात उपस्थित वाहतूक कर्मचाऱ्यांना दिले , पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्यांना कागदपत्रे परत दिली।