धावत्या बसमध्ये महिलेने दिला गोंडस बाळास जन्म

0
1313
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनीधी

अकोट आगाराच्या “अकोट ते यवतमाळ” जाणाऱ्या बस मध्ये प्रवासादरम्यान एका महिलेने कन्यारत्नास जन्म दिला. ही घटना 28 नोव्हेंबर च्या सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली अकोट आगाराच्या या बस वर चालक श्री.व्ही.ए. इंगळे आणि वाहक श्री ए.के. जाधव कर्तव्यावर होते. बसमध्ये राजापेठ अमरावती वरुन गरोदर महिला यवतमाळ जाण्याकरिता बसमध्ये बसली असता धानोरा (गुरव) थांब्याच्या समोर बस निघाल्यावर सदर महिलेला प्रसव कळा येऊ लागल्या परिस्थीतीचे गांभीर्य पाहुन कामगिरीवरील चालक वाहकांनी बस रस्त्याच्या बाजुला उभी करुन बसमधील इतर महिला प्रवाशांच्या मदतीने बसमध्येच प्रसुती होऊन कन्यारत्न जन्माला आले.प्रसुती झाल्याबरोबर कर्तव्यावरील चालक वाहकांनी सदर बस प्रसुती झालेल्या महिला व नवजात बाळासह थेट बस “नांदगाव खंडेश्वर” येथिल शासकीय रुग्णालयाकडे नेली व आई व बाळाला शासकीय रुग्णालयात दाखल केले.आई व नवजात बाळ दोन्हीही सुखरुप आहे व दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे.

अकोट आगारातील कर्तव्यावर असलेले चालक श्री. व्ही. ए. इंगळे व वाहक श्री. ए. के. जाधव यांनी दाखविलेली समयसुचकता व कर्तव्यनिष्ठतेने एसटी. महामंडळाची प्रतिमा जनमानसात उंचविली व महामंडळाचे नावलौकिक झाले…. याबद्दल यवतमाळ आगारातर्फे सदर चालक वाहकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.