आकोलखेड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंना आदरांजली

0
811
Google search engine
Google search engine

 

अकोटः प्रतिनिधी

आकोट तालुक्यातील अकोलखेड येथील माळी समाज पंच मंडळाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १२९ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन बिलबिले मंगल कार्यालयात गुरुवार २८ नोव्हेंबरला सायंकाळी ७ करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल टवलारे हे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा ललित नगराळे,शुभम मुंडोकार होतेे तर देवानंद झाडे,माजी सरपंच तथा सोसायटीचे संचालक केशव लांडे,माजी ग्रा.पं.सदस्य मदन सावळे,सोसायटीचे संचालक निलेश झाडे,माजी ग्रा.पं.सदस्य शिवदास मुर्‍होकार,सोसायटीचे संचालक शंकर खलोकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तंटामुक्ती अध्यक्ष घनश्याम दाते यांनी तर आभार प्रमोद फुलारी यांनी मानले.युवा वक्ते ललित नगराळे व शुभम मुंडोकार यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.देवानंद झाडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले.
महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी राजकुमार फरकाडे,गोपाल गणोरकार,दिलीप लहाने,तुकाराम फुसे,प्रफुल बोरोडे,राजू खैरे, विवेक गणोरकार,मयूर लहाने,प्रशांत झाडे,अशोक पवार,सत्यपाल सावरकर,अमोल निमकर,शंकर गणभोज,शुभम लहाने आदींनी केले.कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.