आरटीओ कार्यालयाच्या  ‘महावॉकेथॉन’ मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

0
517
Google search engine
Google search engine

अमरावती-  वाहतूक सुरक्षेबाबत संदेश देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीतर्फे आज शहरात आयोजित ‘महावॉकेथॉन’ मध्ये अमरावतीकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कॅम्पमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक अहमद यांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनची सुरुवात झाली. कर वसुली विजय गावंडे, प्रदीप गुडदे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सहभागींकडून फलकावर रस्ता सुरक्षेबाबत विविध संदेश प्रदर्शित करण्यात आले.  पुढे जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे गर्ल्स हायस्कूल चौक व पुन्हा परिवहन कार्यालयाकडे असा वॉकेथॉनचा मार्ग होता.
राष्ट्रीय सेवा योजना, ड्रायव्हिंग स्कूलचे कर्मचारी, परिवहन अधिकारी व कर्मचा-यांसह नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.