अमरावती येथे ८ डिसेंबरला मध्यस्थीचा विदर्भस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा

0
2179
Google search engine
Google search engine

अमरावतीः विशेष प्रतीनीधी :-

संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा कार्यगठीत मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळाचे वतीने विदर्भ मराठा समाजाचा अमरावती विभागाचा विवाह इच्छूक उपवर युवक युवतींचा परिचय मेळावा रविवार दि.८ डिसेंबरला सकाळी 10 वाजता अभियंता भवन शेगाव नाका चौक व्हीएमव्ही रोड अमरावती येथे संपन्न होत आहे.या मेळाव्यास युवक-युवती व त्यांचे पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मध्यस्थी मंडळाच्या अमरावती शाखेच्यावतीने करण्यात आले आहे

मध्यस्थी मंडळ शाखा अमरावती द्वारा आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यास विविध गणमान्य यांची उपस्थिती लाभणार आहे

मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली असून स.10  वा सदर मेळावा सुरू होईल
मेळाव्याला मुंबई,पुणेसह संपूर्ण विदर्भ विभागातील विविध स्तरातील विवाह इच्छूक युवक-युवती व त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत.मेळाव्याची जय्यत तयारी मंडळाचे वतीने करण्यात आल्याची माहीती मंडळाधिका-यांनी दिली.

विवाह इच्छूक मुला मुलींनी आपल्या दोन पासपोर्ट फोटो व परिचय पत्रासह मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यांनी केली आहे.