ग्रामिण युवक-युवतींच्या नोंदणीसाठी मध्यस्थीची विशेष मोहीम

0
707
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनिधी

ग्रामिण विशेषतः शेतकरी शेतमजूर कुटुंबातील विवाह इच्छूक मुला मुलींचे विवाह योग सहज जुळावेत.अनुरुप व योग्य स्थळ मिळावेत या हेतूने मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळाचे विद्यमाने ग्रामिण युवक-युवतींच्या नोंदणीसाठी मध्यस्थीची विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी दिली.

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था आकोट द्वारा गठीत मध्यस्थी मंडळाचे विवाह विषयक विविध उपक्रम लोकाभिमुख झाले आहेत.या उपक्रमांतर्गत ग्रामिण विशेषतःशेतकरी शेतमजूर कुटुंबातील विवाह इच्छूक मुला मुलींचे विवाह योग सहज जुळावेत.अनुरुप व योग्य स्थळ मिळावेत या हेतूने मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळाचे विद्यमाने ग्रामिण युवक-युवतींच्या नोंदणीसाठी मध्यस्थीची विशेष मोहीम ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे.या मोहीमेत पालक संपर्क,विवाह इच्छूक मुला मुलींचा शोध,त्यांची नोंदणी व योग्य स्थळांसाठी पालकांचे समुपदेशन व मार्गदर्शन व सहकार्य करण्यावर भर देण्यात येत आहे.तसेच पुनर्विवाह करु इच्छीणा-या युवक-युवतीच्या विवाहासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहे. याहेतूने ग्रामिण युवक-युवतींचा विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येत.आहे.नोंदणी करतांना ग्रामिण युवक-युवतींसाठी सवलती देण्यात येत आहे असे सांगण्यात आले.

या मोहीमेअंतर्गत ग्रामिण शेतकरी शेतमजूर कुटूंबातील विवाह इच्छूक युवक-युवतींनी मंडळाकडे नोंदणी करावी व मंडळाशी संपर्क साधावा .असे आवाहन मंडळांचे उपाध्यक्ष अशोकराव पाचडे ,कोषाध्यक्ष जयकृष्ण वाकोडे,सचिव सुरेशदादा कराळे,सहसचिव नंदकिशोर हिंगणकर ,विलासराव चोरे,महादेवराव सावरकर, नागोराव कुलट,प्रा.साहेबराव मंगळे
नागोराव वानखडे ,मधुकर पुंडकर,ज्योतीताई कुकडे,वृंदाताई मंगळे , यांनी केले आहे.श्रद्धासागर येथे
मध्यस्थी मंडळाचे कार्यालय दररोज स.१०ते ५ दरम्यान सुरु राहील असे कळविण्यात आले आहे