महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदा लागू करून नराधमांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा द्या – हिंदुत्वनिष्ठ संघटना, अमरावती

0
516
Google search engine
Google search engine

अमरावती- संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावणारी घटना नुकतीच हैदराबाद येथील शमसाबाद येथे घडली. एका डॉकटर युवतीवर दुचाकीचे पंक्चर काढण्याच्या बहाण्याने ट्रकचालक, क्लीनर आणि अन्य दोघांनी तिचे अपहरण करून सामूहित बलात्कार केला, इतकेच नव्हे, तर तिला जिवंत जाळून तिची निघृण हत्याही केली. या नराधमांनी घटनास्थळावरून 30 किमी अंतरावर असलेल्या पुलाखाली निर्जनस्थळी तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि कितीही निषेध केला, तरी कमीच आहे. या प्रकरणी आरोपींना अटक झाली आहे.
याप्रकरणामुळे देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याचे पडसाद तेलंगणासह देशभर संतापाची लाट उसळली आहे.
तरी, याप्रसंगी महिला अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी आणि महिलांशी संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. महिलांवरील अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, दोषींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा द्यावी. आणि महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण मिळण्यासाठी व्यवस्था ठिकठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी हिंदु जनजागृती समिती, हिंदू क्रांती सेना, राष्ट्रीय श्रीराम सेना, योग वेदांत सेवा समिती, इत्यादी संघटनेचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.