आकोट यथे साध्वी रेखा दीदी यांचे प्रवचन संपन्न

0
685
Google search engine
Google search engine

अकोट प्रतिनिधी :-

आकोट येथील योग वेदांत सेवा समितीच्या वतीने सिन्धी कॅम्प येथे आयोजित शक्ती धाम मंदिरच्या प्रांगणात साध्वी रेखा दीदी यांचे प्रवचन घेन्यात आले , दिनांक ६ डिसेंबर रोजी या प्रवचनाची सांगता करण्यात आली आपल्या प्रवचनात त्यानी मंत्र,भक्ती,सत्कर्म,उपासना याविषयी लोकांना उपदेश केले, समाजात जगत असताना मी पणाची भावना सोडून,सर्वसमावेशक विचार करावा, समाजातील प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन सत्कर्म आपल्या पदरात पाडून घ्यावे तसेच २५ डिसेंबरला तुळसी पुजन व १४ फेब्रुवारीला मातृ- पितृ पुजन करावे असे विचार त्यांनी व्यक्त केले,

दि.६ डीसेंबरला कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असून यावेळी साध्वी रेखा दिदि यांचा सत्कार माधुरी नाथे, भारती भुस्कट, पुष्पा खोडे, शंकरराव खुमकर, गणेश लवाडे मनोहर चावला, गोपालदास मोटवाणी, रमेशलाल मंघवाणी, मोतीलाल जी मोटवाणी, धनराज पेसवानी, रामसेठ पारवाणी, सतरामदास पारवाणी, केशवभाई वाधवाणी, दत्तात्रय शास्त्री, किर्तीकुमार वर्मा जिवन चौहान, सुधीर जी महाजन आदींनी केला या वेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व महिलाची मोठ्या सख्येने उपस्थिती होती यावेळी दोन्ही दिवस महाप्रसाद चे वाटप करण्यात आला