लाखात एखादी घटना – एका जर्सी गायीला जुळे!(दोन वासरे)

0
2171
Google search engine
Google search engine

कडेगांव/प्रतिनिधी :-

कडेगाव येथील हणमंत श्रीनिवास देशपांडे उर्फ हरीकाका व त्यांचे बंधू सदाशिव श्रीनिवास देशपांडे उर्फ नामदेव यांची कडेगाव येथे पिठाची गिरणी आहे. गेली अनेक वर्षे ते व्यवसाय करीत आहेत. त्याला जोडव्यवसाय काहीतरी हवा म्हणून त्यांनी घराजवळ एक गायीचा गोठा बांधला त्या गोठ्यात जर्सी गाय खरेदी केली.याही व्यवसायाकडे हे दोघेही बंधु जातिने लक्ष घालुन व्यवस्थित चालू ठेवला मग एका गायीवर चाललेला दुध व्यवसाय पुढे तीन गायीवर सुरू झाला.त्यातील एका गायीला चक्क जुळी वासरे झाली आहेत.अशा प्रकारची दुर्मिळ घटना परीसरात किंबहुना कडेगांव तालुक्यात प्रथमच घडली असल्याचे नागरीकातुन व जाणकारातुन बोलले जात आहे.त्यांच्या गोठ्यात येऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गायीची तपासणी केली असता ती गाय व दोन्ही वासरे अगदी ठणठणीत असल्याचे सांगितले.कडेगांव परीसरात गायीला जुळी वासरे झाल्याची घटना कळताच बघ्यांनी गर्दी केली होती.जोड व्यवसाय म्हणुन हरीकाका देशपांडे व सदाशिव उर्फ नामदेव देशपांडे यांनी घरात जवळच एक गोठा बांधला व जर्सी गायी घेतल्या त्यांची वैरणीची,पिण्याच्या पाण्याची,शेणघाण व्यवस्था हे दोघे बंधु चोख करीत असतात.त्यातील एका गायीने दोन वासरांना जन्म दिला.विशेष म्हणजे ही दोनही वासरे वेगवेगळ्या रंगाची आहेत.एकाच वेळी दोन वासरांना जन्म देणे म्हणजे लाखात एखादीच घटना घडती असे शेतकऱ्यांच्यात बोलले जात आहे.आता ही दोन्ही वासरे व गाय एकदम सुदृढ व सुखरूप आहेत.थोडक्यात काय तर गाईची गर्भावस्थेत सकस आहार योग्य निगा व वेळेवर औषध पाणी या घेतलेल्या काळजी मुळेच गाय व दोन्ही वासरे अगदी ठणठणीत आहेत.त्यामुळे कडेगांव तालुक्यात व परीसरात जर्सी गाईला जुळे झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.एकुणच हा दैविक चमत्कारच म्हटले तर वावगे ठरू नये!!