अतुल रघुवंशी यांच्या गळ्यात नगर परिषद उपाध्यक्ष ची माळ. 17 पैकी दोन नगरसेवक अनुपस्थित चांदूर बाजार –

0
735
Google search engine
Google search engine

अतुल रघुवंशी यांच्या गळ्यात नगर परिषद उपाध्यक्ष ची माळ.

17 पैकी दोन नगरसेवक अनुपस्थित

चांदूर बाजार –

स्थानिक नगर पालिकेचे उपाध्यक्ष पदी नगरसेवक अतुल रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आली.१७ नगरसेवक पैकी १० नगरसेवकांनी पसंती दर्शविल्याने त्यांची निवड झाली.
स्थानिक नगरपालिकेत १७ नगरसेवक चे संख्याबळ असून पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. यात भाजप चे ७ व दोन समर्थित असे ९ संख्याबळ आहे. तर प्रहारचे ४ व समर्थित २ असे ६ संख्याबळ सदस्य आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे २ नगरसेवक आहेत. माजी उपाध्यक्ष विजय विल्हेकर यानी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सत्तारूढ भाजपा नगरसेवक अतुल रघुवंशी यांची सत्तारूढ पक्षा तर्फे निवड करण्यात आली.
अतुल रघुवंशी यांच्याविरोधात उपाध्यक्ष पदाकरिता भाजप चे आनंद उर्फ टिकू अहिर, विजय विल्हेकर सह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आबीद हुसेन, यांनी नामांकन दाखल केले होते. ही निवडणूक हात उंच करून घेण्यात आली होती. यात भाजप चे अतुल रघुवंशी याना १० तर राष्ट्रवादी काँग्रेस चे आबीद हुसेन याना ६ नगरसेवकांनी आपले समर्थन दर्शविले होते. तर भाजप चे टिकू अहिर व विजय विल्हेकर याना एकही मत मिळाले नाही. यावेळी नगरसेविका चदा खंडारे व नजीर कुरीशी अनुपस्थित होते. यामुळे यात भाजप चे अतुल रघुवंशी विजयी घोषित करण्यात आले.
पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असून नगराध्यक्ष रविंद्र पवार यांचा मार्गदर्शनात सत्तारूरध सर्वच नगरसेवकांनी अतुल रघुवंशी यांचा नावाला समर्थांन केले. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रविंद्र पवार हे होते. तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहूरवाघ यांनी काम पाहिले.