100 रुपये वर 8 रुपये अडत प्रमाणे शेतकरी पासून वसुली सुरू चांदुर बाजार येथील भाजीपाला मार्केट मधील प्रकार चांदुर बाजार

0
903
Google search engine
Google search engine

100 रुपये वर 8 रुपये अडत प्रमाणे शेतकरी पासून वसुली सुरू
चांदुर बाजार येथील भाजीपाला मार्केट मधील प्रकार

चांदुर बाजार:-

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सकाळी 6 वाजता पासून 8 पर्यत भाजीपाला मार्केट हे बाजार समिती मधील आवारात भरत असतो मात्र या ठिकाणी शेतकरी यांची अडत च्या नावावर आर्थिक लूट सुरू आहे या कडे लक्ष द्यायला प्रशासन याना वेळ नसल्याचे दिसून येत आहे .

तालुक्यातील जवळपास 20 किलोमीटर अंतर पार करून या भाजीपाला मार्केट मध्ये हिरव्या आणि ताज्या भाजीपाला विकायला येत असतो.शेतकरी यांच्या कडून अडत वसूल न करण्याच्या शासन आदेशाला चांदुर बाजार येथे देखील कवडीमोल किंमत असल्याचे दिसत आहे.याबाबत बाजार समिती मधील कोणीच कार्यवाही किंवा साधी चौकशी करायला देखीप तयार नाही.

त्यामुळे शेतकरी यांच्या आर्थिक होणाऱ्या आर्थिक लूट कडे कोण लक्ष देणार हा प्रश्न आहे.आपल्याला रोज भाजीपाला या ठिकाणी विकायला आणावा लागतो तक्रार केली तर आमचा माल खरेदी कोण करणार या भीतीने शेतकरी तक्रार करायला तयार नाही मात्र या वास्तव्य ते कडे कोण लक्ष देणार हा प्रश्न आहे.

प्रतिक्रिया:-
अडत वजा केली असल्याचे तक्रार जर शेतकरी किंवा कोणी केली तर दोषींवर कार्यवाही करणयात येईल शासन परिपत्र नुसार अडत ही शेतकरी पासून घेण्यात येऊ नये असे निर्णय घेण्यात आला आहे.तर जर अडते किंवा व्यापारी अडत घेत असेल तर कार्यवाही केली जाईल. विषय गंभीर असून प्राथमिक चौकशी करतो.
1)मनीष भारबे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती

शेतकरी याच्या नियम लावले जातात मग अडते आणि व्यापारी याना सूट का?हा विषय गंभीर असून शेतकरी जरी तक्रार करत नसेल पण प्राथमिक जबाबदारी म्हणून बाजार समिती ने याची चौकशी करून कार्यवाही करणे आवश्यक आहे.असाच काहीसा प्रकार धान्य बाजार मध्ये सुद्धा आहे.त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.
2)माजी सभापती नंदुकिशोर वानसकर (संचालक)कृषी उत्पन्न बाजार समिती

शेतकरी हितासाठी बाजार समिती आहे.असा जर प्रकार होत असेल तर याची चौकशी मी स्वतः करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करतो.शेतकरी यांच्या हितासाठी पाऊले उचल जातील.
3)प्रमोद घुलक्षे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदुर बाजार

अशी कुठल्याही तक्रार आली नाही तक्रार आल्यास चौकशी करून दोषींवर कार्यवाही केली जाईल.
4)राजेश भुयार सहायक निबंधक चांदुर बाजार