दिव्यांग याना फक्त पोस्टवरच सहानुभूती, प्रत्यक्ष मध्ये चित्र वेगळेच तालुक्यातील अनेक ठिकाणी दिव्यांग चा अपमान चांदुर बाजार:-

0
1304
Google search engine
Google search engine

दिव्यांग याना फक्त पोस्टवरच सहानुभूती, प्रत्यक्ष मध्ये चित्र वेगळेच
तालुक्यातील अनेक ठिकाणी दिव्यांग चा अपमान

चांदुर बाजार:-

जागतिक दिव्यांग दिन काल सर्वत्र साजरा होत असतांना चांदुर बाजार तालुक्यातील अनेक कार्यलाय मध्ये मात्र दिव्यांगाच्या सन्मानाऐवजी अपमान होत असल्याचे चित्र आहे. शासनाची कोणतीच योजना सहजासहजी दिव्यांगापयर्ंत पोहचली नाही. अनेक योजनेसाठी दिव्यांगांना पायपीट करून त्रास सहन करावा लागतो. दिव्यांगाची पिळवणूक करणे हा अधिकार्‍यांचा जन्मसिध्द अधिकाराच झाला का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे
चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायत, तहसील,आरोग्य विभाग,बँक या ठिकाणी दिव्यांगाच्या नावाने अनेक घोटाळे झाले आहेत. वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी केल्यास महाभ्रष्टाचार समोर येईल.

शासनाने दिव्यांगाला सन्मानाने जगण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकार्‍यांनी योजना देण्याऐवजी दिव्यांगांना त्रासच दिला. दिव्यांगांना मिळणारा निधी कधी आणि कश्यासाठी वापरला जातो.याची साधी माहिती देखील ज्या दिव्यांग च्या नावं सांगून खर्च केला जातो याची माहिती नसते.
समाजकल्याण विभागात दिव्यांगासाठी खुप योजना आहेत.

चांदुर बाजार तालुक्यातील पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी यांना आपल्या अडचणी करिता भेटायचे असल्याचे त्यांना पायऱ्या चडून वर जा लागते.तिकडे चांदुर बाजार तसेच शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सेंट्रल बँक आणि तलाठी कार्यलाय मध्ये वृद्ध आणि अपंग बांधव याना पायऱ्या चढवून जावे लागते.त्या ठिकाणी दिव्यांग साठी वर जाण्यासाठी योग्य अशी सोय नसल्याचे दिसून येते.तर हाच काहीशा प्रकार चांदुर बाजार तालुक्यात आहे.जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी केवळ पोस्टर लावून सहानुभूती देऊन खरच दिव्याग याना आधार येत आहे का हा प्रश्न सध्या तालुक्यातील दिव्यांग असलेल्या सर्वसामान्य जनते समोर आहे.