अकोट-अंजनगाव मार्ग रुंदीकरणाचे काम नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी

0
660
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनीधी :-

अकोटनजीक अंजनगाव रोडचे सुरू असलेल्या रुंदीकरण कामामुळं वाहनधारकांना जाताना अतिशय त्रास सहन करावा लागतो आहे. हा मार्ग रुंदीकरण कामासाठी ठीकठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे.अशातच काल दुपारी या मार्गावर कापसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने वाहन चालक रस्त्यावरून जाणारे इतर वाहनधारक हे बालंबाल बचावले रखडलेल्या या कामामुळे नागरिकांनी ठेकेदार व लोकप्रतिनिधींविरूध्द संताप व्यक्त केला आहे. आधीचे रस्त्याचे बांधकाम निट होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या मार्गावर जाताना अनेकांनी अपघाताशी सामना करावा लागत असुन नागरिक त्रस्त झाले आहेत.काल कुटासा येथील कास्तकार ट्रॉली क्र. एमएच ३० एन १०६९ ने कापूस घेऊन पणजकडे जात होती.यावेळी ती अचानक पलटी झाली.
सुदैवाने यात कुणाची जीवित हानी झाली नाही
त्यानंतर दुसरया वाहनाने या ट्रॉलीमधील कापूस भरून रवाना करण्यात आली. विशेष म्हणजे ट्राॅली उलटत असताना बाजूनेच मालवाहू मॅक्सिमो जात होती आणि त्यामध्ये लोक बसलेले होते. परंतु, सुदैवाने काही क्षणातच ही गाडी पुढे निघाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, मॅक्सिमोमधील काहीना किरकोळ मार लागला.

ट्रॉली उलटल्याने नागरिकांचा जमाव घटनास्थळी दाखल झाला.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या ठिकाणी पोलिसांची कुमक,पोहचली यावेळी जमावाने घेराव घालून रस्त्यासंबंधी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ट्रॉली उलटल्याने दोन्ही बाजूने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती