उस्मानाबाद जिल्ह्यात विनयभंगाचे तिन गुन्हे दाखल

0
520
Google search engine
Google search engine

विनयभंगाचे 3 गुन्हे दाखल.

पोलीस स्टेशन, आनंदनगर: एका तरुणी (नाव-गाव गोपनीय) तिच्या कुटूंबियांसह घरी असतांना दि. 09.12.2019 रोजी उमेश पवार व अन्य तिन सर्व रा. उस्मानाबाद यांनी त्यांच्या घरातील सामानाची तोडफोड करुन शिवीगाळ केली व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी उमेश पवार याने लैंगिक उद्देशाने पिडीत तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा. आनंदनगर येथे गुन्हा दि. 10.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन, ढोकी: पप्पु दगडु कांबळे रा. येवती, ता. उस्मानाबाद याने दि. 10.12.2019 रोजी 12.00 वा.सु. लैंगिक उद्देशाने एका महिलेचा (नाव-गाव गोपनीय) हात पकडुन विनयभंग केला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द पोलीस ठाणे, ढोकी येथे गुन्हा दि. 11.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन, भुम: बाबासाहेब यशवंता कुटे रा. सोनगिरी, ता. भुम याने दि. 06.12.2019 रोजी 15.00 वा.सु. एका महिलेचा (नाव-गाव गोपनीय) हात लैंगिक उद्देशाने पकडुन तिचा विनयभंग केला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द पोलीस ठाणे, भुम येथे गुन्हा दि. 11.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.