डंपरच्या धडकेत एक ठार

0
459
Google search engine
Google search engine

डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यु.

पोलीस स्टेशन, उमरगा: गुंडू केरबा टिळे रा. चिंचकोट, ता. उमरगा यांनी डंपर क्र. एम.एच. 25 यु. 0988 हा दि. 02.12.2019 रोजी 12.30 वा.सु. कोरेगाववाडी शिवारातील राजु सगर यांचे खडीकेंद्र येथे निष्काळजपणे चालवुन निजामशा गुडूशा मुर्शद, वय 30 वर्षे, रा. एकुरगा, ता. उमरगा यांना धडक दिली. याअपघातात निजामशा मुर्शद हे लोखंडी सळईच्या जाळीसह खड्डयात पडुन मयत झाले. अशा मजकुराच्या गुडूशा महमदशा मुर्शद यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द पोलीस ठाणे, उमरगा येथे गुन्हा दि. 10.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.