दोन कारची धडक एका मुलाचा म्रत्यू

0
479
Google search engine
Google search engine

दोन कारच्या अपघातात एक अल्पवयीन मुलगा मयत.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण): स्कॉर्पीओ क्र. केए 32 एन 3363 च्या अज्ञात चालकाने दि. 05.12.2019 रोजी 22.45 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर मौजे आळणी फाटा येथे स्कॉर्पीओ निष्काळजीपणे चालवून अंजली राजेंद्र पवार रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर ह्या त्यांच्या नातेवाईकांसोबत बसुन येत असलेल्या कार क्र. एम.एच. 25 एएल 6651 ला धडक दिली. या अपघातात अंजलीसह त्यांचे नातेवाईक जखमी झाले व अंजली पवार यांचा मुलगा- पांडु राजेंद्र पवार वय 05 वर्षे हा मयत झाला आहे. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराकामी न नेता, घटनेची खबर पोलीसांना न देता वाहन चालक घटनास्थळावरुन वाहनासह निघुन गेला. अशा मजकुराच्या अंजली पवार यांच्या फिर्यादीवरुन वरील स्कॉर्पीओच्या अज्ञात चालकाविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद ग्रामीण येथे भा.दं.वि. कलम 279, 304 (अ), 338 सह मो.वा.का. कलम 134(अ)(ब), 184 प्रमाणे गुन्हा दि. 06.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.