धारणी पत्रकार हल्ला :- चांदुर बाजार पॉवर ऑफ मीडिया चे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याबाबत निवेदन

0
760
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार  / प्रतिनिधी :-

धारणी येथील एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी मलिक शेख यांच्यावर काही समाजकंटकांनी काल दिनांक 12 डिसेंबर हल्ला केला त्यांच्यावर जवळपास पाच ते सहा चाकूचे वार करण्यात आले. ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो समाजाचे प्रतिबिंब पत्रकारांच्या माध्यमातून समाजात मांडले जात असतात. याच पत्रकारावर मागील काही काळापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे हल्ले झाले .

एक प्रकारचा पत्रकार निपक्षपातीपणा ला ब्रेक लावण्याचा प्रयत्न हा काही समाजकंटक कडून वारंवार होत आहे. मात्र म पत्रकार संरक्षण कायदा संमत केला असून त्याची प्रभावी अशी अंमलबजावणी सध्या महाराष्ट्र राज्य झाली नसल्याचे दिसून येते.या झालेल्या घटनेचा तीव्र निषेध संपूर्ण जिल्हयात उमटले असताना चांदूरबाजार येथील द पावर ऑफ मीडिया फाऊंडेशनचे कार्यकारणी यांनीसुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच विरोधी पक्षनेता विधानसभा देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय राज्यपाल यांना निवेदन दिले आहे.हे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.

पत्रकार यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू करून पत्रकारांना आवश्यक त्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे सुद्धा निवेदन यावेळी तहसीलदार त्यांच्या बाबत मुख्यमंत्री यांना देण्यात आले यावेळी चांदुर बाजार चे नायब तहसीलदार नीलिमा मते,नायब तहसीलदार अर्जुन वांदे चांदूरबाजार कार्यकारिणीचे अमरावती जिल्हा सदस्य बादल डकरे ,मुख्य सल्लागार ओमप्रकाश कुऱ्हाडे ,तालुका, अध्यक्ष शशिकांत निचत शहराध्यक्ष वैभव उमक,सचिव स्वप्नील डांगरे, कोषाध्यक्ष नकुल सोनार, प्रसिद्धीप्रमुख रिजवान हुसेन, सदस्य सुरज देव्हाते, प्रतिक भागवत,चांदूरबाजार चे ज्येष्ठ पत्रकार मदन भाटे, विलास पंचभाई आणि शरद केदार पत्रकार उपस्थित होते