शरद जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

0
1297
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतीनिधी:-

शेतकरी संघटनेने आज उपविभागीय कार्यालय अकोट येथे एकदिवसीय धरणे आंदोलन दिले. या मध्ये शासनाला लक्ष केंद्रित करण्याकरिता सूचक संदेश देण्यात आले.शरद जोशी यांच्या पुण्यतिथी निम्मित व नवीन सरकार ला शेतकरी कर्जमुक्ती व शेती निर्बंध मुक्ती करिता राज्यव्यापी आंदोलन झाले. शेतकऱ्यांना सुखा आणि सन्मानाने जगण्याकरिता शेतकऱ्यांना निव्वळ कर्जमुक्त करून साध्य होणार नसून सर्वप्रथम शेतकऱ्यावर असलेले कर्ज रद्द करून नवीन कर्ज त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. व घेतलेली कर्ज शेतकरी परतफेड करू शकेल या करिता शेती मालावर असलेली बंधन समाप्त करण्यात यावी. शेती मालाच्या बाजारातील शासकीय हस्तक्षेप बंद करण्यात यावा. आयात निर्यात कोणतेही निर्बंध न लावता मोकळीक देण्यात यावी या मागणी करिता शेतकरी संघटना ने कर्जमुक्ती आणि निर्बंधमुक्ती आंदोलन केले होते या दिशेने राज्य आणि केंद्र सरकार ने पावले न उचल्यास येणाऱ्या 22 डिसेंबर ला शेतकरी संघटना रास्ता रोको आंदोलन राज्यभर करणार आहे.याची घोषणा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट करतील. हे आंदोलन राज्यव्यापी असेल. अकोट येथिल आंदोलनाला प्रमुख मार्गदर्शक शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित दादा बाहाळे, माजी जिल्हा प्रमुख ,शेतकरी संघटना माहिती व तंत्रज्ञान आघाडी लक्ष्मीकांत कौठकर, माजी जिल्हाप्रमुख सतीश देशमुख जेष्ठ नेते विनोद मोहकार,तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे,संजय ढोकने,गजानन मोहोकार, सतीश सरोदे, जाफर खा,मोहन गीते, रवींद्र गीते ,गणेश गीते ,बाळू पाटील गीते,छोटू पाटील गीते, संजय भविर,युवराज भविर,संजय ढोकने, विठ्ठल उकळकर,