अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाबा ते बाबा अभियान

0
545
Google search engine
Google search engine

अकोट ता. प्रतिनिधी :-

अकोट तालुक्यातिल ग्राम बोर्डी येथे दि.११ रोजी श्री नागास्वामी महाराज मंदिर बोर्डी येथे अखिल भारतिय अंधश्रध्दा निर्मूलन समिती अकोला जिल्हा ग्रामीणच्या वतीने बाबा ते बाबा अभियान २०१९ चा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर गये होते.तर प्रमुख पाहूणे अशोक घाटे,नरेंद्र इंगळे,विलास ठोसर,अरुण सांगळूदकर,घनशाम दाते,लाभले होते.अंनिसचे वक्ते तथा कथाकार नरेंद्र इंगळे यांनी अनिष्ट रुढीवर …तर कवी विलास ठोसर यांनी कविते सोबत अवास्तव गोष्टीवर ग्रामवासीयांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले.अशोक घाटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन बाबत लोकांना सविस्तर माहिती दिली.यावेळेस मंचावर गावातील देवीदास बुले,सुभाष लटकूटे,रमेश पाटील खिरकर,तुळशीराम इस्तापे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रास्ताविक योगेश कडू यांनी केले.सदर कार्यक्रमाला गावातील बहुसंख पुरुष मंडळी,महिला मंडळी,युवा तरुण मंडळी,प्रामुख्याने उपस्थिती होती.