अनियंत्रित वाहतूक मुळे विद्यार्थी याचा जीव धोक्यात, शाळा सुटल्याबरोबर निघून जातात वाहतूक पोलीस ,तर शाळेच्या जबाबदारी चे काय?पालकवर्गात संतापाची लाट

0
789
Google search engine
Google search engine

अनियंत्रित वाहतूक मुळे विद्यार्थी याचा जीव धोक्यात, शाळा सुटल्याबरोबर निघून जातात वाहतूक पोलीस ,पालकवर्गात संतापाची लाट

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार ते मोर्शी रोड वर जवळपास चार शाळा आहे.या रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी राहत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी पोलीस प्रशासन याना पत्र देऊन देखील अध्यपही काहीच कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थी याना शाळा सुटल्यावर जीवघेणा मार्ग ओलांडावा लागत आहे.या कडे पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष होत असल्याचे अपघात ची शक्यता नाकारता येत नाही.

चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोर्शी रोड वर नगर परिषद प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालय, जी.आर.काबरा महाविद्यालय,नगर परिषद उर्दू माध्यमिक शाळा आहेत. जवळपास या शाळेच्या सुरुवात आणि सुटण्याची वेळ एकच असल्याने अनेक वेळा विद्यार्थी यांचा गोळका बाहेर येत असल्याने आणि त्यात वाहनाची वर्दळ आणि नॅशनल हायवे वाढलेले अतिक्रमण यामुळे मोठी दुर्घटना झाल्यास याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न उपस्थित आहे.?

या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांची मागणी अनेक वेळा केली गेली मात्र पोलीस प्रशासन यांनी या कडे दुर्लक्ष केल्याने त्याचा विद्यार्थी यांच्या होणाऱ्या त्रास बद्दल चिंताजनक नसल्याचे दिसून येते.तसेच जी आर काबरा माध्यमिक विद्यालय आणि नगर परिषद मराठी विद्यालय यांनी अध्यापही पोलीस विभागाला पत्र दिले नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे शाळा खरच विद्यार्थी प्रति जागरूक आहे की नाही हा प्रश्न आहे.तर वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी हे नेमके शाळा सुटण्याच्या वेळीच कोठे ड्युटी करतात हा प्रश्न बरोबर पालक वर्गात रोष व्यक्त होत आहे.