भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर बोर्डी येथे संपन्न

0
476
Google search engine
Google search engine

 

आकोटः रोटरी क्लब ऑफ़ बॉम्बे ह्यँगींग गार्डन, मुंबई दम्माणि नेत्र रूग्णालय ,अकोला आणी संवेदना गृप अकोला यांच्या सौजन्याने गेल्या तिन वर्ष्या पासुन सतत यावर्षी सुध्धा श्री.नागास्वामि महाराज मंदिर बोर्डी येथे गुरूवार दि.12/12/2019 ला वेळ 12 ते 3 परंत भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष : मनोहर गये बोर्डी हे होते.तर कार्यक्रमाचे उदघाटक : आशिष शामरावजी आपोतीकर हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे : शामराव आपोतीकर,सभापती शुक्ल,विजय राऊत,अशोक खेडकर,पुष्पाताई आपोतिकर,हे होते तर गावातील प्रमुख उपस्थिती :अजय देशमुख,दिनेश देशमुख,आनंदराव लाहौरे,सुभाष खिरकर,सुभाष लटकुटे,नंदलाल राय,देवानंद खिरकर पत्रकार,डॉ महल्ले,डॉ ढोकने,प्रशांत धर्मे,धर्मराव देशमुख,कूंदन देशमुख,राजेश देशमुख,हर्शल देशमुख,आशिष देशमुख, आयोजक : दिनेश देशमुख.हे होते.
शिबिरामधे 255 रुग्णांची नोंदणी झाली.नोंदणि फी फक्त 20 रुपये होती.तर काही रुग्णांना शिबिरामधे तपासणी झाल्या नंतर अल्पदरात फक्त 100 रुपये मधे शिबिरातच चष्मे सुध्धा देण्यात आले.तर काही रुग्णांची तपासणी करुन त्यांना ऑपरेशन करने करिता दम्माणी नेत्र रूग्णालय अकोला येथे तारीख देवून बोलावन्यात आले आहे. यामधे गरजू रुग्णांंनी बाहेर गाववरून येवुन सुध्धा बरेच रुग्णांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला आहे.