*माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तुत्वाचे फलीत समृद्धी महामार्गाला विदर्भ-मराठवाडा नाव द्यावे – माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे*

0
1077
Google search engine
Google search engine

अमरावती:-

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा विदर्भाच्या उन्नतीचे प्रवेशद्वार आहे. विकासाला चालना देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तुत्वाचे फलीत समृद्धी महामार्गाला “ विदर्भ-मराठवाडा समृद्धी महामार्ग ” असे नामकरण करावे व तातडीने विदर्भ -मराठवाडा समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करावे हि संपूर्ण विदर्भ –
मराठवाडावासीची तीव्र भावना आहे. असे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी निवेदन
केले आहे.

आजपर्यंत मुंबई या
राजधानीसोबत व मुख्य बंदरासोबत विदर्भ दूर रहाला आणि त्यामुळेच विदर्भातील शेतमाल असो किंवा कारखान्यातील तयार माल असो त्यांना मुंबईची बाजारपेठ मिळू शकली नाही.विदर्भाचा
विकास साधायचा असेल तर मुंबई सारखी बाजारपेठ व निर्यातीकरिता बंदर मिळाले पाहिजे या मुख्य उद्देशाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे नियोजन केले. दुर्दैवाने शिवसेनेने नेहमीप्रमाणे याही प्रकल्पाला सुरवातीपासून विरोध केला. मा. उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधाला न जुमानता तत्कालीन कैबिनेट
मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे जमीन अधिग्रहनाचा शुभारंभ केला.

विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची भूमिका या समृद्धी महामार्गाच्या विरोधातच होती. कोल्हापुर ते मुंबई महामार्ग ६ तासात जाणारा पाहिजे परंतु विदर्भाला जोडणाऱ्या महामार्गाला विरोध का? हा सवाल डॉ. अनिल बोंडे यांनी विधिमंडळाच्या भाषणात विचारला होता. आजही कोल्हापुर वरून पुणे – मुंबई प्रवास ६ तासात करता येतो आणि हा कमी वेळातील प्रवास पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठ उपलब्ध करून देतो.
त्याशिवाय रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांना मुंबईतील विविध कंपन्यामध्ये संधी प्राप्त होते. प्रशासकीय कामाकरिता ६ तासात पोहोचणारे कार्यकर्ते व अधिकारी
मुंबईमध्ये मंत्रालयात व विविध कार्यालयात पोहोचतात नेमकी हीच बाब देवेंद्र फडणवीसांनी हेरली व समृद्धी महामार्गाची मुहूर्तमेढ केली.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबईला आठ तासात जोडले जाईल. नागपूर अमरावतीचा संत्रा, फुल,फळे, भाज्यांना मुंबईची बाजारपेठ प्राप्त होईल अमरावतीच्या textile पार्कमधील कापड,
शिवलेले कपडे निर्यातीकरिता व विक्रीकरिता कमी वेळात, कमी पैशामध्ये मुंबईला पाठविणे शक्य होईल. आज रेल्वेवर अवलंबून
राहणाऱ्या सर्व प्रवाशांना सुद्धा ८ ते १० तासात मुंबई गाठता येईल.

रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात या समृद्धी मार्गामुळे वाढणार आहेत. या मार्गावर असणाऱ्या १० नोड्स व्यापारी, प्रवाशांना थांबा, जवळपासच्या प्रदेशामधून निघालेल्या मालाची साठवणूक, विक्री, सेवाक्षेत्र, हॉटेल, लॉजीस्टिक इत्यादीच्या सुविधामुळे हजारो तरुणांना रोजगार प्राप्त होईल.

हा महामार्ग औरंगाबाद, नाशिक वरून जात असल्याने मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र जोडल्या जाणार आहे. तेथील बाजारपेठ विदर्भाला प्राप्त होणार आहे तसेच मराठवाडा व उत्तर
महाराष्ट्र सुध्दा रोजगार व व्यापाराकरिता समृद्ध होणार आहे. त्यामुळेच माजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच स्वप्न व उद्धिस्ट असलेला हा समृद्ध महामार्गी
खऱ्या अर्थाने विदर्भ- मराठवाड्यातील शेतकरी, युवक-युवती, सामान्य माणसांचा
विकासाचा महामार्ग असणार आहे.

करिता विकासाला चालना देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तुत्वाचे फलीत समृद्धी महामार्गाला “ विदर्भ –मराठवाडा समृद्धी महामार्ग ” असे नामकरण करावे व तातडीने विदर्भ समृद्धी महामार्गाचे काम पूर्णकरावे हि संपूर्ण विदर्भ-मराठवाडा वासीची
तीव्र भावना आहे. असे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी निवेदन केले आहे.