मारहाण करुन पैशे काढुन घेतले

0
416
Google search engine
Google search engine

भुखंडावर अतिक्रमण, गुन्हा दाखल.

पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर): 1) आण्णासाहेब भागवत पाटील 2) रवि प्रल्हाद मुंडे 3) विनोद विष्णु मुंडे 4) अमिर इसाक शेख सर्व रा. उस्मानाबाद यांनी आपापसात संगणमत करुन स्नेहलता विलासराव गायकवाड रा. उस्मानाबाद यांच्या मालकीच्या नेहरु चौक मेन रोड लगत असलेल्या न.प. घर. नं. 8/26 सिटी सर्वे नं. 4978 मध्ये त्यांचा कसलाही संबंध नसतांना दि. 22.09.2019 रोजी 18.00 ते 23.30 वा.सु. अतिक्रमण करुन पत्र्याचे शेड उभारले आहे. अशा मजकुराच्या स्नेहलता गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर) येथे गुन्हा दि. 14.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मारहाण करुन पैसे काढून घेतले, गुन्हा दाखल.

पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (ग्रामीण): 1) संतराम हरिबा चव्हाण 2) कुणाल संतराम चव्हाण दोघे रा. शिक्षक कॉलनी, उस्मानाबाद 3) देविदास पुना राठोड रा. जहागिरदारवाडी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 13.12.2019 रोजी 20.30 वा.सु. मौजे जहागिरदारवाडी शिवारात देविदास भाऊ राठोड रा. घाटंग्री, ता. उस्मानाबाद यांना खाली पाडुन धारधार हत्याराने मारहाण करुन जखमी केले व त्यांच्या खिशातील रोख रक्कम 60,000/-रु. काढून घेतले. तसेच त्यांच्या पत्नीस धक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या देविदास राठोड यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण) येथे गुन्हा दि. 14.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पैशाच्या कारणावरुन मारहाण.

पोलीस स्टेशन, भुम: 1) शिवाजी बाबुराव बारगजे 2) नंदकिशोर शिवाजी बारगजे 3) भारत चंद्रकांत बारगजे सर्व रा. वाशी, ता. वाशी यांनी दि. 14.12.2019 रोजी 18.30 वा.सु. सुधाकर बाबुराव बारगजे रा. वीरसावरकर चौक, भुम यांच्या घरात घुसून त्यांच्या हायवे रोडमध्ये गेलेल्या शेतजमीनीचा मिळालेला मावेजातील पैशांच्या कारणावरुन त्यांना शिवीगाळ करुन लाथा-बुक्यांनी मारहाण केली व पैसे दिले नाहीत तर तुला सोडणार नाही. असे म्हणुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुधाकर बारगजे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पोलीस ठाणे, भुम येथे गुन्हा दि. 15.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मालवाहतुक वाहनाची मोटारसायकलला धडक.

पोलीस स्टेशन, बेंबळी: ईसराईल उर्फ पापा दिलदार मुलाणी रा. समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद याने मालवाहतुक जितु वाहन क्र. एम.एच. 25 पी 4840 ही दि. 13.12.2019 रोजी 23.00 ते 23.10 वा.सु. समुद्रवाणी फाटा ते समुद्रवाणी जाणाऱ्या रोडवर निष्काळजीपणे चालवून बबलु हमीद शेख रा. समुद्रवाणी हे चालवत असलेल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 7095 ला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात बबलु शेख व मोटारसायकलवर पाठीमागे बसलेले सादीक हमीद शेख हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर ईसराईल उर्फ पापा दिलदार मुलाणी हे अपघातातील जाखमींना औषधोपचाराची सुविधा न पुरवता व अपघाताची खबर पोलीसांना न देता वाहनासह निघुन गेले. अशा मजकुराच्या बबलु हमीद शेख यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द पोलीस ठाणे, बेंबळी येथे गुन्हा दि. 14.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक.

पोलीस स्टेशन, बेंबळी: ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच. 5809 च्या (अज्ञात) चालकाने दि. 03.12.2019 रोजी 12.00 वा.सु. बेंबळी ते बोरखेडा रोडवर निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून संजय बनकट कासार रा. पाडोळी, ता. उस्मानाबाद हे चालवत असलेली मोटारसायकल क्र. एम.एच. 25 जे 7852 ला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात संजय कासार यांच्या डाव्या पायाच्या मांडीचे हाड मोडुन ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक अपघातातील जाखमींना औषधोपचाराची सुविधा न पुरवता व अपघाताची खबर पोलीसांना न देता ट्रॅक्टरसह निघुन गेला. अशा मजकुराच्या संजय कासार यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच. 5809 च्या अज्ञात चालकाविरुध्द पोलीस ठाणे, बेंबळी येथे गुन्हा दि. 14.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मोटारसायकल चोरीस.

पोलीस स्टेशन, आनंदनगर: बसवेश्वर रामचंद्र चनशेट्टी रा. जिजाऊ नगर, रेल्वेस्टेशन नगर, उस्मानाबाद यांची होंन्डा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 7771 किं.अं. 40,000/-रु. ही दि. 13.12.2019 ते 14.12.2019 रोजी 06.00 वा.चे दरम्यान जिजाऊ नगर, रेल्वेस्टेशन नगर, उस्मानाबाद येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द पोलीस ठाणे, आनंदनगर येथे गुन्हा दि. 14.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

जुगार अड्डयावर छापा.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण): महेश दिलीप हाके रा. येडशी, ता. उस्मानाबाद हे दि. 14.12.2019 रोजी 15.30 वा.सु. मौजे येडशी येथे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 630/-रु. च्या मालासह पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण) यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण) येथे गुन्हा दि. 14.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण): बंडु शंकर शिंदे रा. रामलिंग नगर, येडशी, ता. उस्मानाबाद हे दि. 14.12.2019 रोजी 18.30 वा.सु. मौजे येडशी येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 लिटर गावठी दारु किं.अं. 550/-रु. चा माल स्वत:च्या कब्जात बाळगला असतांना पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण) यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण) येथे गुन्हा दि. 14.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मोटार वाहन कायदा-नियमांचे उल्लंघन 60 कारवाया.

उस्मानाबाद जिल्हा: दि. 14/12/2019 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व जिल्हा वाहतुक शाखा उस्मानाबाद यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या विविध कलम-नियमांनुसार 60 कारवाया केल्या असुन त्यातुन 9,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल करण्यात आले आहे.