कोंडच्या तलावातून बेसुमार पाणि ऊपसा ; चोरांना गाव पुढार्यांचे आभय ?

0
411
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील पाझर तलावातून खुलेआम बेसुमार पाणी उपसा होत असल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे त्यामुळे कोंड गावासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी भविष्यात या तलावाचा उपयोग होणार आहे. परंतु सध्या या तलावातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा केला जात आहे. तलावामध्ये भलेमोठे जास्त पावर वर चालणारे विद्युत मोटार पंप बसवलेले आहेत.

त्यामुळे पाण्याचा बेसुमार खुलेआम पाणि उपसा होत आहे.
पाण्याचा उपसा तर होतच आहे परंतु या विद्युत मोटारीसाठी लागणारे करंट चे वायर हे रस्त्यावरच आहे व तलावाच्या शेजारी ही उघडे वायर पडलेले आहेत त्यामुळे तलावावर पाणी पिण्यासाठी जनावरे येत असतात त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर ये- जा करणाऱ्या लोकांना या रस्त्यावर उघडे वायर पडल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या लोकांनाही धोका निर्माण झालेला आहे. या वायर वरून वाहने ये-जा करतात ते वायर कट झाले तर केव्हाही करंट उतरू शकते सदर प्रकार हा आतिशय गंभीर आहे. पाणी चोरणारे लोक हे बिनधास्तपणे राजरोस पाणी उपसा करत आहेत परंतु यांच्याकडे कोणत्याही गाव पुढाऱ्याने लक्ष दिले नाही. हे गावकारभारी यांना अभय देतात कि काय आसा सवाल उपस्थित होत आहे हे मात्र खरेच आहे पण प्रशासनही याच्या कडे दुर्लक्ष करत आहे.
सदर पाणी उपसा बंद करावा व रस्त्यावर पडलेले वायर काढावे अशी मागणी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांकडून केली जात आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून भविष्यात गावासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. पावसाळा कमी झाल्यामुळे निवळी तलाव व भेटा साठवण तलावातील पाणी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तात्काळ या दोन्ही तलावातील मोटारी पंप लाणार्यावर तात्काळ कारवाई करून पंप जप्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.