शालेय कुडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकाची निवड – पाच विद्यार्थ्यांना पदके शालेय कुडो राज्यस्तरिय स्पर्धेत कुराश स्पोर्ट असोशिएशनने दाखविली चमक

0
422
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे:

                    महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व राज्य कुडो संघटना यांच्यावतीने बुलढाणा येथे राज्य स्तरिय शालेय कुडो स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये चांदूर रेल्वेच्या कुराश स्पोर्ट असोशिएशनच्या एकाची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली असून पाच विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली आहे
बुलढाणा येथील राज्यस्तरिय कुडो स्पर्धेत कुराश असोशिएशनच्या रक्षा शर्मा हिने १९ वर्ष व ५३ किलो वजन गटात आपले कौशल्य दाखवित सुवर्ण पदक पटकविले.रक्षा शर्मा हिची निवड मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुडो स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच सुयश वानखडे याने रौप्य, चैतन नेवारे याने कास्य पदकाची कमाई केली. तर नुपूर हाडके व तनुश्री पळसकर यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रशस्तीपत्र प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे
कुराश असोसिएशनचे अध्यश गणेश रॉय, अशोक मोटघरे, उमेंद्र ढगे, सुरेश तिखे, सुमंत अंबुलकर, अँड.मनोज अंबाळकर, डॉ.गणेश वऱ्हाडे, डॉ.क्रांतीसागर ढोले, डॉ.प्रफुल मरसकोल्हे, विवेक देशमुख, संजय भाटे, किसन देशमुख यांसह संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छे देऊन कौतुक केले आणि राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. कुडो प्रशिक्षक संदिप देशमुख व असलम शाहा यांच्या मार्गदर्शनात कुडो खेळाडूनी यश संपादन केले. विजयी विद्यार्थी प्रशिक्षक संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक संताबाई यादव नगरात गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणावर कसुन सराव करीत आहे. त्यांना वेळोवेळी चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी, श्रध्दा वादाये, स्नेहा चंदाराणा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.