अंबाजोगाई येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपीवर कडक कारवाई करावी .

0
580
Google search engine
Google search engine

 

विद्यार्थी संघर्ष कृती समितीची मागणी.

परळी/प्रतिनिधी :- दिनांक 17 डिसेंबर 2019 रोजी अंबाजोगाई या ठिकाणी खोलेश्वर विद्यालयातील इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केला ही घटना अंबाजोगाई सारख्या शिक्षणाचे माहेरघर समजणाऱ्या शहराला व शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे गेल्या अनेक दिवसापासून बलात्कार , छेडछाडी सारख्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे महिला-मुली यांच्यामध्ये या वाढत्या प्रकरणामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे आज पुन्हा महिला व मुली सुरक्षित नाहीत असं सदरील प्रकरणामुळे सिद्ध होत आहे हैदराबाद या ठिकाणी झालेल्या प्रकरणानंतर देशांमध्ये मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत अंबाजोगाई येथील प्रकरणातील संबंधित नराधम शिक्षकांवर फास्टट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी विद्यार्थी संघर्ष कृती समिती परळी वैजनाथ च्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणावर आरोपीवर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यामध्ये संघर्ष समितीचे दिपक गित्ते, अमोल वाघमारे, नितीन ढाकणे, चैतन्य मुंडे, ज्ञानेश्वर मुंडे, गणेश नागरगोजे, महिला सदस्य ज्ञानेश्‍वरी गित्ते आदी उपस्थित होते.