बीड शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात क्रिकेट प्रशिक्षण कँपचे उदघाटन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले.

0
555
Google search engine
Google search engine

बीड नितीन ढाकणे, दिपक गित्ते  

बीड जिल्ह्याच्या मातीने अनेक क्षेत्रात जिल्ह्याचा गौरव वाढवणारे नामवंत भूमीपुत्र दिले आहेत.क्रीडा क्षेत्रात ही जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी विद्यार्थी,युवक आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने कौतुकास्पद कामगिरी करत आहेत.बीड जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच खेळाडूंना विविध खेळांचे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, क्रीडा क्षेत्राचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी खा.प्रितमताई मुंडे प्रयत्न करणार आहेत.सामाजिक,राजकीय क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्रात सुद्धा जिल्ह्याचे नाव उंचावणारे खेळाडू निर्माण व्हावेत व खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळून क्रीडा क्षेत्रात आपल्या जिल्ह्यातील भूमीपुत्रांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी येणाऱ्या काळात काम करणार असल्याचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.