*तुळजापूर येथे वडिलांना मुलींनी दिला खांदा व भडाग्नी….मुलींनी पाडला परिवर्तनवादी पायंडा* चांदुर बाजार शशिकांत निचत

0
967
Google search engine
Google search engine

*तुळजापूर येथे वडिलांना मुलींनी दिला खांदा व भडाग्नी….मुलींनी पाडला परिवर्तनवादी पायंडा*

चांदुर बाजार शशिकांत निचत

चांदुर बाजार तालुक्यातील नजीकच्या तुळजापूर गढी येथील गुरुदेव भक्त व गुरुदेव सेवा मंडळ चे निष्ठावान कार्यकर्ते श्री विनायकराव बिरे उर्फ अण्णाजी यांचे दुखःद निधन झाले.त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या मुलींनी खांदा देउन व मुखाग्णी देउन नवा परिवर्तनवादी पायंडा पडल्याने सर्वत्र याचे कौतुक होत आहे.

तसे तुळजापूर गढी हें गुरुदेव सेवा मंडळाच्या विचारांनी प्रभावित असलेले गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तुकारामदादा गीताचार्य यांच्या कार्याचा या गावात वावर राहिलेला आहे.येथीलच विनायकराव बिरे यांनी आपली जमीन दान केली यांवर 2004 मधे तुकारामदादा गीताचार्य व लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले व यांवर गुरुदेव सेवा मंडळसाठी भव्य सभागृह उभारले गेले.यातच रोजची प्रार्थना व इतर उपक्रम नियमित चालतात.

अशातच वयोमानानुसार बिरे यांचे दुखःद निधन झाले.त्यांच्या मागे तिन मुली कुसुम चौधरी शोभा अम्रूते व लहान संगीता वानखडे मुलगा नसल्याने खांदा कोन देनार हा प्रश्नच उपस्थित झाला नाही कारण मुलगा मुलगी भेद नको ही राष्ट्रसंताची शिकवण असल्याने जेष्ठ मुलीने मुखाग्णी देणे व इतर दोन मुलींनी खांदा देण्याचे ठरले.गुरुदेव सेवा मंडळ भजन मंडळीची साथ सोबत होतीच.या परिवर्तनवादी कार्याला अध्यात्म गुरुकुल चे संचालक रवि मानव गुरुदेव सेवा मंडळ चे आखरे महाराज पारीसे महाराज वाकोडे महाराज नानासाहेब काटोलकर अनिल नवलकर यांची उपस्थिती होती.यावेळी यांची श्रध्दांजलीपर भाषणेही झालीत.यावेळी परिसरातील गुरुदेव प्रेमी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.